Remdesivir injections : Breaking centre reduces price of remdesivir injections by nearly rs 2000 | Remdesivir injections : दिलासादायक! केंद्र सरकारनं 2 हजार रुपयांनी कमी केली रेमडेसिविरची किंमत

Remdesivir injections : दिलासादायक! केंद्र सरकारनं 2 हजार रुपयांनी कमी केली रेमडेसिविरची किंमत

महिनाभरापासून देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येनं उच्चांक गाठला आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार कमी होण्यासाठी शासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. तरीही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. अशात कोरोना रुग्णांच्या उपचारात सगळ्यात महत्वाचे ठरलेल्या रेमडेसिविरच्या तुटवड्यामुळे राज्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

रेमडेसिविरचा काळाबाजार, टंचाई, पुरवठा वाढवणं अशा वेगवगेळ्या मुद्द्यांवरून केंद्र आणि राज्यपातळीवर उपाय शोधले जात आहेत. दरम्यान रेमडेसिविरच्या किमतींबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे.केंद्र सरकारने देशातील कोरोना रूग्णांना मोठा दिलासा मिळवून रेमडिसिव्हिर इंजेक्शनची किंमत कमी केली आहे.

सरकारने या इंजेक्शनची किंमत 2 हजार रुपयांनी कमी केली आहे. देशात 7 वेगवेगळ्या कंपन्या रेमडेसिविर इंजेक्शन तयार करतात. ही इंजेक्शन्स कोरोनाच्या उपचारात वापरली जातात. कोरोनाव्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे देशात या इंजेक्शनची मागणीही वाढली आहे. ज्यामुळे सरकारने किंमती कमी करून सामान्य लोकांपर्यंत पोहोच वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

या २ कारणांमुळे वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; AIIMS च्या संचालकांनी सांगितली मोठी कारणं

या इंजेक्शनची किंमत कमी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. या किंमती कमी करण्यासाठी, रासायनिक खते मंत्रालय उत्पादक कंपन्यांशी मागील 2 दिवसांपासून बैठक करीत होते. सरकार रिमडिसिव्हिर इंजेक्शनचे उत्पादन वाढविण्याबरोबरच किंमत कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे.

काय आहे हेमोफीलिया, या आजाराच्या नावानं लोक का घाबरतात?

सध्या, 7 भारतीय कंपन्या मेसर्स गिलीड साइंसेज अमेरिकेच्या कराराअंतर्गत ही इंजेक्शन्स तयार करीत आहेत. गिलियड सायन्सेस, यूएसए त्यांच्याकडे दरमहा सुमारे. 38.80 लाख युनिट करण्याची क्षमता आहे. ही क्षमता दरमहा किमान 50 लाखांपर्यंत वाढविण्यात यावी अशी सरकारची इच्छा आहे. जेणेकरून कोरोना संक्रमीत  रूग्णांच्या उपचारांना गती देता येऊ शकते. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Remdesivir injections : Breaking centre reduces price of remdesivir injections by nearly rs 2000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.