संतापजनक! लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून प्रियकरानं वडिलांच्य साह्यानं महिलेला जाळले जिवंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 21:06 IST2017-09-25T21:02:59+5:302017-09-25T21:06:45+5:30
लग्नाची मागणी फेटाळून लावली म्हणून संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

संतापजनक! लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून प्रियकरानं वडिलांच्य साह्यानं महिलेला जाळले जिवंत
बांसवाडा - लग्नाची मागणी फेटाळून लावली म्हणून संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम आणि लग्न या प्रत्येकाच्या आयुष्यतील महत्वाच्या गोष्टी असतात. लग्न म्हणजे नेमकं काय असतं...? ते केवळ कर्तव्यबंधन नसतं तर , दोन मनांचं अतूट बंधन असतं. लग्नात दोन मन जुळली जातात. मात्र राज्यस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यात लग्नासाठी नकार दिला म्हणून प्रियकरानं तिला चक्क जाळल्याची धक्कादायक घटना घडली. या कुकर्ममध्ये प्रियकराला त्याच्या वडिलांनी साथ दिली.
बाप आणि मुलानी मिळून त्या मुलीला जिंवत जाण्याचा प्रयत्न केला. सीमा यादव असे या पीडितेचे नाव आहे. तिच्यावर सध्या उदयपूरच्या रूग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी सीमाचा प्रियकर रवी यादव, त्याचे वडिल चंदू यादव आणि आई गंगा यादव या तिघांनाही अटक करण्यात आली. काल रविवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली.
या तिघांनी रस्त्यावर बेदाम मारहाण केली. तसेच आपल्या अंगावर रॉकेल ओतले आणि पेटवून दिले असा कबुली जबाब पीडित महिलेने दिला. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणात गुन्हाही नोंदवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. माध्यमांच्या वृत्तानुसार, सध्या सीमाची प्रकृती चिंताजनक असून, ती जगेल की नाही हे देखील सांगता येत नाही.
फक्त लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून महिलेला जाळण्यात आले. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. देशातील महिला सुरक्षित नाहीत हे अशा घटनांमधून वारंवार समोर येत आहे. दरम्यान, आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी सीमा यादवच्या कुटुंबाने पोलिसांकडे केली आहे.