Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 20:43 IST2025-11-10T20:40:34+5:302025-11-10T20:43:28+5:30

Red Fort Blast Death News: देशाची राजधानी एका भीषण स्फोटाने हादरली. या स्फोटात दहापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, अनेकजण जखमी झाले आहेत.  

Red Fort Blast Video: Many people were left in tatters! You will be shocked to see the scenes after the bomb blast, where exactly did the incident take place? | Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?

Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?

Red Fort Bomb Blast: सोमवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास देशाची राजधानी दिल्ली एका भयंकर स्फोटाने हादरली. लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळी गेट नंबर एकजवळ रस्त्यावरून जात असलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या गाड्याही उडाल्या. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या घटनेत दहा लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक जखमी झाले आहेत. या भीषण स्फोटानंतरचे व्हिडीओ समोर आले आहेत. अनेक लोकांच्या मृतदेह भाग रस्त्यावर उडाले आहेत. 

दिल्लीच्या अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६.५५ वाजता लालकिल्ला मेट्रो स्टेशनजवळ स्फोट झाल्याची माहिती देणारा कॉल आला. त्यानंतर सात अग्निशामक वाहने आणि १५ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. या स्फोटाने आजूबाजूच्या कारही उडून आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. 

घटनास्थळी मिळाले अनेक मृतदेह

एएनआय या वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले असून, अनेक मृतदेह दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात आणण्यात आले आहेत. अनेक लोक जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.  

गाड्यांचे सांगाडे उरले

रस्त्यावर झालेल्या या स्फोटात मागे पुढे असलेल्या अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहेत. स्फोट झालेल्या कारजवळ असलेल्या इतर गाड्यांचे वेगवेगळे भाग होऊन हवेत उडाले. या स्फोटाच्या तडाख्यात सापडलेल्या माणसांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या. काही मृतदेह रस्त्यावर पडलेले होते. 

घटनेची माहिती मिळताच युद्धपातळीवर मदत आणि बचाव मोहीम हाती घेण्यात आली. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी संपूर्ण परिसर बंद केला. अग्निशामक दलाच्या जवानांकडून उशिरापर्यंत स्फोटामुळे लागलेली आग विझवण्याचे काम सुरू होते. 

ज्या ठिकाणी स्फोट झाला, त्या ठिकाणी एनएसजी आणि एनआयएचे पथकेही दाखल झाली. घटनास्थळाची पाहणी तपास अधिकाऱ्यांकडून सुरू करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची दखल घेऊन तपास यंत्रणांना वेगाने तपास करण्याचे आदेश दिले आहेत. 

मुंबईतील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर 

राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. सर्व रेल्वे स्थानके, गर्दीच्या ठिकाण सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी नाकाबंदी आणि वाहनांची तपासणी सुरू केली आहे. संवेदनशील ठिकाणी आणि भागांमध्ये गस्त वाढवण्यात आली आहे. 

Web Title : दिल्ली के लाल किले के पास धमाका, मेट्रो के पास मौतें।

Web Summary : दिल्ली के लाल किले मेट्रो स्टेशन के पास कार बम विस्फोट में दस की मौत। सोमवार शाम को हुए विस्फोट में आसपास के वाहन जल गए। अधिकारी जांच कर रहे हैं, बचाव कार्य जारी है।

Web Title : Delhi's Red Fort rocked by blast; fatalities reported near metro.

Web Summary : A car bomb near Delhi's Red Fort metro station killed ten. The explosion, occurring Monday evening, ignited nearby vehicles. Rescue operations are underway as authorities investigate.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.