शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

खलिस्तानी दहशतवादाची पाळेमुळे उखडून टाकण्याची मोहीम तीव्र; 'या' दहशतवाद्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 08:53 IST

करणवीर सिंग हा वाधवा सिंग आणि हरविंदर सिंग रिंडा या दहशतवाद्यांचा उजवा हात असल्याचे म्हटले जाते.

खलिस्तानी दहशतवाद्यांना कॅनडात आश्रय देण्याच्या मुद्द्यावरून कॅनडासोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची भूमिका अधिक कठोर झाली आहे. खलिस्तानी दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सरकारने उघडपणे दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारच्या विनंतीवरून इंटरपोलने सोमवारी प्रतिबंधित दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलचा (Babbar Khalsa International) सदस्य करणवीर सिंग (Karanvir Singh) याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. 

करणवीर सिंग हा वाधवा सिंग आणि हरविंदर सिंग रिंडा या दहशतवाद्यांचा उजवा हात असल्याचे म्हटले जाते. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करणवीर सिंग सध्या पाकिस्तानात लपला आहे. इंटरपोल पोर्टलनुसार, करणवीर सिंग (38) हा मूळचा पंजाबमधील कपूरथला जिल्ह्यातील रहिवासी आहे. इंटरपोलनेही या खलिस्तानी दहशतवाद्याविरुद्ध जारी केलेली नोटीस आपल्या वेबसाइटवर अपडेट केली आहे. भारतात दहशतवादी घटनांसाठी निधी उभारणे, कट रचणे आणि संघटना तयार करणे यासह अनेक गंभीर प्रकरणांमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.

फुटीरतावादी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा यांच्यात राजनैतिक तणाव असताना खलिस्तानी दहशतवादी करणवीर सिंगविरोधात इंटरपोलची नोटीस जारी करण्यात आली आहे. दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारताने आपल्या देशांतर्गत राजकारणाच्या दबावाखाली हरदीप सिंह निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला होता, त्यावर भारताने याचे जोरदार खंडन करत चोख प्रत्युत्तर दिले होते.

रेड कॉर्नर नोटीस का जारी केली जाते?इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी करणे म्हणजे संबंधित देशांचे पोलीस आरोपीला शोधतात आणि त्याचे प्रत्यार्पण किंवा अन्य कायदेशीर कारवाई होईपर्यंत त्याला आपल्या ताब्यात ठेवतात. दरम्यान, इंटरपोलने यापूर्वी गँगस्टर हिमांशू उर्फ ​​भाऊच्या विरोधात सर्व सदस्य देशांना रेड नोटीस बजावली होती. हिमांशू परदेशात राहत असल्याचे समजते. हरयाणा पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, रोहतक पोलिसांना एका मोस्ट वाँटेड आरोपीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात यश आले आहे, जो परदेशात पळून गेला आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIndiaभारतCanadaकॅनडाCrime Newsगुन्हेगारी