शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

लाल मुंग्यांची चटणी कोरोनावरील उपचारात प्रभावी? हायकोर्टाने आयुष मंत्रालयाला दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 14:58 IST

Corona Virus News : आदिवासी बहुल भागामध्ये खाण्यात येणारी लाल मुंग्यांची चटणी कोरोनाविरोधातील उपचारांमध्ये लवकरत वापरण्यात येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देदेशातील अनेक राज्यांमध्ये आदिवासी लोक लाल मुंग्यांचा वापर ताप, सर्दी-खोकला, श्वास घेण्यास त्रास, थकवा आणि अन्य आजारांवर इलाज म्हणून करतातओदिशा हायकोर्टाने या चटणीच्या औषधी उपयोगाबाबतचा आदेश एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना दिला आहेही याचिका इंजिनियर नयाधर पाढियाल यांनी दाखल केली होती

नवी दिल्ली - कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी जगभरातील नामांकित कंपन्यांनी अनेक लसी विकसित केल्या आहेत. मात्र भारतात कोरोनावरील विविध मार्गांनी उपचारांच्या बातम्या येत असतात. आता ओदिशा आणि छत्तीसगडमधील आदिवासी बहुल भागामध्ये खाण्यात येणारी लाल मुंग्यांची चटणी कोरोनाविरोधातील उपचारांमध्ये लवकरत वापरण्यात येण्याची शक्यता आहे. आयुष मंत्रालय लवकरच या चटणीला कोरोना विषाणूविरोधातील औषध म्हणून मान्यता देण्याची शक्यता आहे. याबाबत ओदिशा हायकोर्टाने आयुष मंत्रालयाला तीन महिन्यात चौकशी करून निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ओदिशा हायकोर्टाने आयुष मंत्रालय आणि कौन्सिल ऑफ सँटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चच्या महासंचालकांना याबाबत लवकरच निर्णय घेण्याची सूचना केली आहे. याबाबत तीन महिन्यात निर्णय घ्यावा, असे हायकोर्टाने म्हटले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे देशातील अनेक राज्यांमध्ये आदिवासी लोक लाल मुंग्यांचा वापर ताप, सर्दी-खोकला, श्वास घेण्यास त्रास, थकवा आणि अन्य आजारांवर इलाज म्हणून करतात.या लाल मुंग्यांच्या चटणीमध्ये लाल मुंग्या आणि हिरव्या मिरच्यांचा समावेश असतो. ओदिशा हायकोर्टाने या चटणीच्या औषधी उपयोगाबाबतचा आदेश एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना दिला आहे. या जनहित याचिकेमध्ये लाल चटणीच्या औषधी प्रभावाबाबत माहिती घेण्यासाठी काहीच पावले उचलण्यात येत नसल्याची न्यायालयाने दखल घ्यावी अशी मागणी या याचिकेमधून करण्यात आली होती.ही याचिका इंजिनियर नयाधर पाढियाल यांनी दाखल केली होती. यापूर्वी पाढियाल यांनी कोरोनाविरोधात लाल मुंग्यांच्या चटणीच्या वापराबाबत सूचना केली होती. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली. पाढियाल यांच्या मते, या चटणीमध्ये फॉर्मिक अ‍ॅसिड, प्रोटिन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी१२, झिंक आणि लोह यांचा समावेश असतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. ओदिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय येथील आधिवासी लाल मुंग्या खातात. तसेच अनेक आजारांवर उपचारांमध्ये त्याचा वापर करतात. त्यामुळेच आदिवासी भागात कोरोनाचा तितकासा फैलाव झाला नाही, असा दावा त्यांनी केला.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यHigh Courtउच्च न्यायालय