शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीने जोर धरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 06:12 IST

राजस्थानच्या स्थितीवर अशोक गेहलोत व काँग्रेस नेत्यांत चर्चा

नवी दिल्ली : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना आता त्या राज्याचे मुख्यमंत्री करावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून पुन्हा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील राजकीय स्थितीबाबत  मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, के.सी. वेणुगोपाल आदी नेत्यांशी चर्चा केली. राजस्थानच्या मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आटोपल्यानंतर शनिवारी रात्री राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, प्रदेश काँग्रेसमध्ये विविध पदांवरील नियुक्त्या याबाबतही लवकरच निर्णय घेण्याचे या चर्चेत ठरविण्यात आले. राजस्थानमध्ये मंत्रिमंडळ विस्तार व्हावा तसेच संघटनात्मक बदल करावेत, अशी मागणी सचिन पायलट व त्यांच्या समर्थकांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात केली होती. मात्र त्यादिशेने अद्याप काहीच हालचाल न झाल्यामुळे पायलट व त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत सरकारला १७ डिसेंबर तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. कोरोना साथीचा काळामध्ये राजस्थानविषयी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे काँग्रेसने टाळले होते. पण  ती प्रक्रिया काँग्रेस नेतृत्वाने आता सुरू केली आहे.या राज्यामध्ये दोन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकांचे निकाल २ नोव्हेंबरला लागणार आहेत. राजस्थानच्या मंत्रिमंडळात सध्या नऊ पदे रिकामी आहेत. निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर व दिवाळीनंतर राजस्थान मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.मतभेद कमी करण्यावर भरराजस्थानमध्ये २०२३ साली विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या राज्यात काँग्रेसमधील मतभेद कमी करण्यावर पक्षश्रेष्ठींनी भर दिला आहे. अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यातील मतभेद खूप वाढले, तर विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला प्रसंगी पराभव पत्करावा लागेल याची जाणीव असल्याने राजस्थानबाबत पक्षश्रेष्ठी आता सावधपणे निर्णय घेत आहेत.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेस