शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 16:53 IST

Bihar Election Update: भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. केंद्रात नितीशकुमारांच्या मदतीनेच सरकार सुरु आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरला ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. अशातच भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. केंद्रात नितीशकुमारांच्या मदतीनेच सरकार सुरु आहे. यामुळे त्यांना नाराज केले तर केंद्रात अडचणी येऊ शकतात यामुळे एनडीएसाठी तारेवरची करसत असताना त्यांचाच एक मित्रपक्ष लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) वेगळे लढण्याचे संकेत देत होता. परंतू, आज चिराग पासवान यांनी याची घोषणाच करून टाकली आहे. 

पासवान यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या निवडणुकीत आपला पक्ष सर्वच्या सर्व २४३ जागा लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. एनडीएला मजबूत करण्याच्या उद्देशाने लढणार असल्याचे ते म्हणाले. भोजपूरमध्ये एका सभेत त्यांनी ही घोषणा केली आहे. 

आपला पक्ष कोणत्याही प्रकारे एनडीएपासून वेगळा नाही, आपण बिहारमधील २४३ जागांवर निवडणूक लढवू. जेणेकरून एनडीए मजबूत होईल आणि आपण एकत्रितपणे विजयाकडे वाटचाल करू, असे ते म्हणाले. आपल्या पक्षाने नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे, असे ते म्हणाले. 

मागील निवडणुकीतही पासवान यांनी आपण मोदींचा हनुमान असल्याचे सांगत स्वतंत्र निवडणूक लढविली होती. यानंतर लोकसभेपूर्वी नितीशकुमार यांची जेडीयू आणि लोजपा यांना पुन्हा भाजपाने एकत्र आणले होते. यानंतर चिराग पासवान केंद्रात नव्या सरकारमध्ये मंत्री देखील झाले आहेत. आता स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याने पासवान मंत्रिपदाचा राजीनामा देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पासवान यांना निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी राजीनामा द्यावा लागेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. 

टॅग्स :chirag paswanचिराग पासवानBiharबिहारElectionनिवडणूक 2024BJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार