शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
6
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
7
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
8
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
9
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
10
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
11
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
12
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
13
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
14
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
15
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
16
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
17
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
18
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
19
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
20
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात प्रत्यक्षात ‘स्पेशल २६’

By admin | Updated: December 29, 2016 00:48 IST

सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून पाच जणांनी मुथुट फायनान्समधील ४० किलो सोने पळविल्याची खळबळजनक घटना हैदराबादेत घडली. या सोन्याची किंमत

हैदराबाद : सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून पाच जणांनी मुथुट फायनान्समधील ४० किलो सोने पळविल्याची खळबळजनक घटना हैदराबादेत घडली. या सोन्याची किंमत अंदाजे १२ कोटी रुपये एवढी आहे. तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यात ही घटना घडली. पोलीस उपायुक्त विश्व प्रसाद यांनी सांगितले की, सकाळी साडेनऊच्या सुमारास हे पाच जण लाल रंगाच्या स्कोर्पिओतून आले. आपण सीबीआयचे आणि आरबीआयचे अधिकारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून हे सोने ताब्यात घेतले आणि वाहनातून ते पसार झाले. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी ४० किलो सोने आणि एक लाख रुपये रोख पळविले आहेत. येथील कर्मचाऱ्यांकडून आणखी माहिती एकत्रित केली जात आहे. सायबराबादचे पोलीस आयुक्त संदीप शांडिल्य यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ते म्हणाले की, अनेक नागरिकांनी काळ्याचा पांढरा पैसा करण्यासाठी सोने खरेदी केले आणि ते बँकेत ठेवले असल्याची माहिती मिळत आहे. येथील रेकॉर्ड तपासले असता येथील कर्मचाऱ्यांनीही येथे लॉकर उघडले असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांबाबतही संशय बळावला आहे. येथील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येणार असून विशेष तपास पथकही स्थापन करण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या चोरट्यांनी पळून जाण्यापूर्वी येथील सीसीटीव्ही कॅमेराची तोडफोड केली आहे. सीसीटीव्ही रेकॉर्ड आणि हार्ड डिस्क घेऊन हे चोरटे पळून गेले. दरम्यान, या घटनेनंतर मोठ्या संख्येने या बँकेचे ग्राहक येथे दाखल झाले आणि आपले सोने परत करण्याची मागणी केली. दरम्यान, श्वान पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे, तर रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. भरदिवसा या फायनान्स कंपनीतून १२ कोटी रुपयांचे सोने पळविल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. उल्हासनगर येथील मणप्पुरम गोल्ड फायनान्सच्या कार्यालयात भिंतीला भगदाड पाडून दोनच दिवसांपूर्वी चोरट्यांनी ३० किलो सोने व रोख रक्कम पळवून नेली होती. (वृत्तसंस्था)टीबीझेड आणि स्पेशल २६ या घटनेमुळे पोलिसांसह अनेकांना स्पेशल-२६ या अक्षयक?मारच्या चित्रपटाची आठवण झाली. मुख्य म्हणजे मुंबईतील गिरगावच्या आॅपेरा हाउस भागातील त्रिभुवनदास भिमजी झवेरी ज्वेलर्सवर १९८७ साली याच प्रकारे काही जणांनी दरोडा घातला होता. एका बसमधून आलेल्या काही जणांनी त्या दुकानात शिरून आपण सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासविले होते आणि दुकानातील सर्व दागिने ताब्यात घेत पोबारा केला होता. ते दरोडेखोर अद्याप सापडले नसून, त्यावरच स्पेशल २६ हा चित्रपट आधारित होता.