मालदीवमध्ये स्पीड बोट उलटून रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:32 IST2026-03-21T12:32:09+5:302026-03-21T12:32:23+5:30

या अपघातानंतर रॅली ड्रायव्हर हरिसिंगसह दोन भारतीय बेपत्ता आहेत, तर तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात मालदीवच्या फेलिधू भागात गुरुवारी रात्री ११च्या सुमारास झाला.

Raymond Group Chairman Gautam Singhania injured in speed boat capsize in Maldives | मालदीवमध्ये स्पीड बोट उलटून रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया जखमी

मालदीवमध्ये स्पीड बोट उलटून रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया जखमी

नवी दिल्ली : रेमंड ग्रुपचे चेअरमन व एमडी गौतम सिंघानिया शुक्रवारी मालदीवमध्ये स्पीड बोट उलटल्याने जखमी झाले. या बोटीत सिंघानियांसह सात जण होते. त्यांना तत्काळ विमानाने मुंबईत आणण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघातानंतर रॅली ड्रायव्हर हरिसिंगसह दोन भारतीय बेपत्ता आहेत, तर तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात मालदीवच्या फेलिधू भागात गुरुवारी रात्री ११च्या सुमारास झाला. सिंघानिया यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर बोटीतील पाच जण वाहून गेले होते. यात एक रशियन महिला व चार भारतीय पुरुषांचा समावेश होता.

दरम्यान, मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्सच्या कोस्ट गार्डनुसार, समुद्रातील उंच लाटांमुळे बेपत्ता प्रवाशांचा शोध घेणे कठीण होत आहे. बोटीतील एका प्रवाशाचा हात तुटला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. गौतम सिंघानिया व हरिसिंग हे दोघे मित्र असून दोघांनाही ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा छंद आहे. सिंघानिया हे स्वत: प्रोफेशनल रेसर असून हरिसिंग यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत.

Web Title : मालदीव में स्पीड बोट दुर्घटना में रेमंड ग्रुप के चेयरमैन गौतम सिंघानिया घायल

Web Summary : मालदीव में एक स्पीड बोट दुर्घटना में रेमंड ग्रुप के चेयरमैन गौतम सिंघानिया घायल हो गए। नाव पर सात लोग सवार थे। रैली ड्राइवर हरिसिंह समेत दो लापता हैं। सिंघानिया को मामूली चोटें आई हैं और मुंबई में उनका इलाज चल रहा है। चुनौतीपूर्ण समुद्री परिस्थितियों के बीच लापता लोगों की तलाश जारी है।

Web Title : Raymond Group Chairman Gautam Singhania Injured in Maldives Boat Accident

Web Summary : Raymond Group Chairman Gautam Singhania was injured in a Maldives speed boat accident. Seven people were on board. Two are missing, including rally driver Harisingh. Singhania sustained minor injuries and is receiving treatment in Mumbai. Search efforts are ongoing for the missing individuals amidst challenging sea conditions.

टॅग्स :Accidentअपघात