Ravi Kumar has written to President Ramnath Kovind to appoint him as temporary executioner in Tihar Jail | 'निर्भया बलात्कारातील आरोपींच्या फाशीसाठी मला जल्लाद करा'; राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे मागणी
'निर्भया बलात्कारातील आरोपींच्या फाशीसाठी मला जल्लाद करा'; राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे मागणी

नवी दिल्ली: निर्भया सामूहिक बलात्काराचे गुन्हेगारांकडे बचावासाठी कमी कायदेशीर उपाय शिल्लक असल्याने न्यायालयाकडून आरोपींना फाशीची तारीख कधीही घोषित करण्यात येऊ शकते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिहार कारागृहात फाशी देणारा (जल्लाद) उपलब्ध नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. परंतु शिमलामधील रवी कुमारने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून तिहार कारागृहात मला तात्पुरता जिल्लाद म्हणून नियुक्त करण्याची विनंती केली आहे.

रवी कुमार यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पत्र लिहून माझी तिहार कारागृहात तात्पुरती जल्लाद म्हणून नियुक्ती करावी, जेणेकरुन निर्भया प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर फाशी देऊन तिच्या आत्म्यास शांती लाभेल अशी विनंती केली आहे.

तिहार कारागृहाच्या सूत्रांनी कारागृहात फाशी देणारा जल्लाद नसल्याचे सांगितले होते. तसेच निर्भया बलात्काराच्या आरोपींना पुढील एका महिन्यात कधीही फाशी देण्याचा निर्णय दिला जाऊ शकतो अशी माहिती दिली होती. राष्ट्रपतींनी निर्भयाच्या दोषींची दया याचिका फेटाळल्यानंतर फाशीची तारीख निश्चित केली जाणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान याआधी संसदेवरील हल्ल्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या अफझल गुरूला तिहारमध्ये फाशी देण्यात आली होती. अफजलला फाशी देण्यापूर्वी तुरूंगाच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती. अफझलला फाशी देताना तुरूंगातील कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. अफजलला फाशी देताना तुरुंगातील कर्मचाऱ्याला फाशीचा दोरखंड खेचण्याची परवानगी देण्यात आली होती. फाशी देण्यासाठी जल्लाद यांची कमतरता लक्षात घेता तुरुंग अधिकाऱ्यांनी अनौपचारिक चर्चा करताना दुसऱ्या कारागृहातून जल्लाद बोलवणार असल्याचे सांगितले होते. 

Web Title: Ravi Kumar has written to President Ramnath Kovind to appoint him as temporary executioner in Tihar Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.