रतन टाटा यांची ८६व्या वर्षी 'स्वप्नपूर्ती', मुंबईत उभारलं १६५ कोटीचं 'पेट' हॉस्पिटल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 14:09 IST2024-02-08T14:08:36+5:302024-02-08T14:09:22+5:30
Ratan Tata’s pet project - उद्योगपती रतन टाटा यांनी ८६व्या वर्षी त्यांचं सर्वात मोठे स्वप्न पूर्ण केले.

रतन टाटा यांची ८६व्या वर्षी 'स्वप्नपूर्ती', मुंबईत उभारलं १६५ कोटीचं 'पेट' हॉस्पिटल
Ratan Tata’s pet project - उद्योगपती रतन टाटा यांनी ८६व्या वर्षी त्यांचं सर्वात मोठे स्वप्न पूर्ण केले. सुमारे ३८०० कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेले रतन टाटा हे जगभरातील सर्वात प्रसिद्ध भारतीय उद्योगपतींपैकी एक आहेत. आपण समाजाचं देणं लागतो, याची प्रचिती त्यांच्या प्रत्येक कृतीतून येते आणि समाजकार्यात ते नेहमीच आघाडीवर असतात. एक यशस्वी उद्योगपतीसह रतन टाटा हे प्राणीप्रेमी म्हणूनही ओळखले जातात आणि त्यांना कुत्र्यांबद्दल विशेष प्रेम आहे. सोशल मीडियावर त्यांनी कुत्र्यांसोबतचे अनेक फोटोही पोस्ट केले आहेत.
टाटा समूहाकडूनही प्राण्यांबद्दल सहानुभूती वेळोवेळी व्यक्त केली जात आहे आणि त्यासाठी त्यांनी जनजागृती करण्यासाठी अनेक मोहिमा सुरू केल्या आहेत. याच मार्गावर पुढे जात असताना रतन टाटा पुढील महिन्यात भारतातील सर्वात मोठ्या पशु रुग्णालयांपैकी एक रुग्णालय सुरू करणार आहेत. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना रतन टाटा यांनी त्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या ड्रीम प्रोजेक्टची माहिती दिली.
रतन टाटा Tata Trusts Small Animal Hospital या नावाने पेट प्रोजेक्ट मुंबईत उभा करत आहेत आणि यासाठी त्यांनी १६५ कोटी रुपये खर्च केले आहेत. २.२ एकरमध्ये हा प्रोजेक्ट आहे आणि येथे हे कुत्रे, मांजर, ससे आणि इतर लहान प्राण्यांसाठी असलेल्या मोजक्या रुग्णालयांपैकी एक असेल आणि ते २४ तास सुरू असेल. “पाळीव प्राणी हे कुटुंबातील सदस्यासारखेच असतात. मी आयुष्यभर अनेक पाळीव प्राण्यांचे पालकत्व सांभाळले आहे आणि म्हणून मी या हॉस्पिटलची गरज ओळखतो,” असे रतन टाटा यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.
रतन टाटा यांच्या प्राण्यांसाठीच्या नवीन रुग्णालयाने प्रशिक्षणासाठी रॉयल व्हेटर्नरी कॉलेज लंडनसह यूकेच्या पाच पशुवैद्यकीय शाळांसोबत भागीदारी केली आहे. या रुग्णालयात प्राण्यांवर शस्त्रक्रिया, निदान आणि फार्मसी सेवा देण्यात येणार आहे. चार मजली रुग्णालयात २०० रुग्णांची क्षमता असेल आणि हे सर्व ब्रिटीश पशुवैद्य थॉमस हिथकोट यांच्या देखरेखीखाली होईल.