सामूहिक बलात्कारानंतर मदत करणा-या वाहन चालकानेही केला बलात्कार, एका रात्रीत दोन वेळेस नराधमांनी केलं शिकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 20:29 IST2017-12-11T20:25:05+5:302017-12-11T20:29:44+5:30
16 वर्षांच्या कॅन्सरग्रस्त अल्पवयीन तरूणीच्या कुटुंबियांकडे उपचारासाठी पैसे नसल्याचा फायदा उचलत एक ओळखीचा व्यक्ती तिला रूग्णालायात घेऊन जाण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला.

सामूहिक बलात्कारानंतर मदत करणा-या वाहन चालकानेही केला बलात्कार, एका रात्रीत दोन वेळेस नराधमांनी केलं शिकार
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे 16 वर्षांच्या कॅन्सरग्रस्त अल्पवयीन तरूणीवर एकाच रात्रीत दोन वेळेस बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. येथील सरोजनी नगर येथे पीडितेच्या ओळखीच्या सहका-याने एका मित्रासोबत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रस्त्यावरून जाणा-या एका वाहन चालकानेही मदत करण्याच्या बहाण्याने तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.
रूग्णालयात नेण्याच्या बहाण्याने केला बलात्कार -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता लखनऊच्या सरोजनी नगरच्या नटकुर गावातील रहिवासी आहे. कुटुंबियांकडे तिच्या उपचारासाठी पैसे नसल्याचा फायदा उचलत एक ओळखीचा व्यक्ती तिला रूग्णालायात घेऊन जाण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला. पण रूग्णालयात न जाता त्याने त्याच्या एका मित्राला बोलावलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पीडितेला रस्त्यावर सोडून त्यांनी पळ काढला.
मदत करणा-यानेही केलं शिकार-
सामूहिक बलात्कारानंतर रस्त्यावरून जाणा-या एका वाहन चालकाकडे पीडितेने मदतीची याचना केली. मदत करण्याच्या बहाण्याने त्यानेही तरूणीवर बलात्कार केला. त्यानंतर कशीबशी पीडिता घरी पोहोचली आणि घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबियांसह पोलीस स्थानकात जाऊन सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दुस-यांदा बलात्कार कऱणा-याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर अन्य दोघं फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.