मदरशातील बलात्कार प्रकरण: सीसीटीव्हीत दिसले मुलगा-मुलगी, मौलवीच्या भूमिकेवर संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 10:10 IST2018-04-27T10:10:14+5:302018-04-27T10:10:14+5:30

साहिबाबादमधल्या एका मदरशामधल्या मुलीवरील बलात्कार प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचची टीम चौकशी करतेय. या मदरशातील बलात्कार प्रकरणात मौलानाच्या शिवाय एक अल्पवयीन मुलगा आरोपी आहे.

rape in sahibabad madrassa delhi police questioned students cctv footage gave important clue | मदरशातील बलात्कार प्रकरण: सीसीटीव्हीत दिसले मुलगा-मुलगी, मौलवीच्या भूमिकेवर संशय

मदरशातील बलात्कार प्रकरण: सीसीटीव्हीत दिसले मुलगा-मुलगी, मौलवीच्या भूमिकेवर संशय

उत्तर प्रदेश- साहिबाबादमधल्या एका मदरशामधल्या मुलीवरील बलात्कार प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचची टीम चौकशी करतेय. या मदरशातील बलात्कार प्रकरणात मौलानाच्या शिवाय एक अल्पवयीन मुलगा आरोपी आहे. दिल्ली पोलिसांची टीम बुधवारी मदरशामध्ये दाखल झाली आणि तिथे जाऊन काही विद्यार्थ्यांची चौकशी केली. काही स्थानिक लोकांनाही विचारणा करण्यात आली. या मदरशातून पीडित मुलीला ताब्यात घेण्यात आलं आहे. अपहरण करून मदरशात ओलीस ठेवून माझ्यावर बलात्कार करण्यात आला, अशी माहिती पीडितेनं दिली.

दिल्ली पोलीस आता या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहे. पोलिसांच्या चौकशीत सीसीटीव्ही फुटेजच्या प्रमुख पुरावे सापडले आहेत. गाझियाबादेतल्या हिडन विहार कॉलनीमधून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अल्पवयीन मुलगा पीडित मुलीबरोबर दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडित मुलगी एक टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये पाहायला मिळते. तसेच त्या मुलानं शर्ट आणि ट्राऊजर घातलं होतं. मुलगी अचानक त्या मुलाच्या मागून जाताना दिसते आहे. त्याच्या काही वेळानंतर ती सीसीटीव्हीतून गायब झाली. तर मदरशाजवळ राहणा-या काही व्यक्तींनी या दोघांना मदरशात जाताना पाहिलं.

मदरशातील मुलाच्या मित्रांना या प्रकाराची माहिती होती आणि त्यांनी मुलीला लपवण्यासाठी त्याची मदत केल्याचाही पोलिसांना संशय आहे. तर ज्या मौलवीच्या खोलीत मुलीला ओलीस ठेवून बलात्कार करण्यात आला होता, त्या मौलवीनं स्वतः निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. तसेच पोलिसांनीही अद्याप मौलवीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवलेला नाही. या घटनेवेळी मी मदरशात नव्हतो, असा दावा त्या मौलवीनं केला आहे. पोलीस मौलवीच्या त्या दाव्याची सत्यता पडताळते आहे. मौलवीशिवाय आरोपी विद्यार्थ्याचे कॉल रेकॉर्ड्सही तपासण्यात येत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात 17 वर्षीय तरुणाला आरोपी बनवलं आहे. त्याच्यावर अपहरण आणि पॉक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदवला असून, त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. 

Web Title: rape in sahibabad madrassa delhi police questioned students cctv footage gave important clue