Ranya Rao: नोव्हेंबरमध्ये रान्या रावशी लग्न, एका महिन्यातच झाले वेगळे; कोर्टात काय म्हणाला अभिनेत्रीचा पती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 11:32 IST2025-03-18T11:32:05+5:302025-03-18T11:32:32+5:30
Ranya Rao Gold Smuggling Case: रान्या रावबद्दल दररोज नवीन खुलासे होत आहेत. अभिनेत्रीचा पती जतिन हुक्कर याचं एक विधान आता समोर आलं आहे.

Ranya Rao: नोव्हेंबरमध्ये रान्या रावशी लग्न, एका महिन्यातच झाले वेगळे; कोर्टात काय म्हणाला अभिनेत्रीचा पती?
सोने तस्करी प्रकरणात कारवाईला सामोरे जाणाऱ्या रान्या रावबद्दल दररोज नवीन खुलासे होत आहेत. अभिनेत्रीचा पती जतिन हुक्कर (Jatin Hukkeri) याचं एक विधान आता समोर आलं आहे. जतिन हुक्करकडून अटकेपासून सूट मिळावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले.
११ मार्च रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने हुक्करवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले, कारण त्याला रान्या रावशी असलेल्या संबंधांमुळे ताब्यात घेतलं जाऊ शकते अशी भीती होती. सुनावणीदरम्यान हुक्करचे वकील प्रभुलिंग नवदगी यांनी न्यायालयाला सांगितलं की, जतिनने नोव्हेंबरमध्ये रान्या रावशी लग्न केलं होतं परंतु डिसेंबरपासून त्यांच्यातील काही समस्यांमुळे ते अनौपचारिकपणे वेगळे राहत आहेत. पुढील सुनावणी २४ मार्च रोजी होणार आहे.
रान्या रावचे वडील आणि आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांनी लग्नानंतर त्यांची मुलगी कुटुंबापासून दूर गेल्याचं म्हटलं होतं. रान्याला ३ मार्च रोजी दुबईहून सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आलं होतं आणि सध्या ती कोठडीत आहे. कनिष्ठ न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शनिवारी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.
दुबईहून दरवेळी १५ किलो सोनं आणून किती कमाई करायची रान्या राव?, झाला धक्कादायक खुलासा
अभिनेत्रीने २०१४ मध्ये 'माणिक्य' या कन्नड चित्रपटातून पदार्पण केलं आणि नंतर 'वगाह' आणि 'पटकी' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं, परंतु अचानक ती इंडस्ट्रीतून गायब झाली. चित्रपटांमधून गायब झाल्यानंतर ती बेकायदेशीर कृत्य करू लागली. भारत आणि दुबईमधील सोन्याच्या किमतीतील फरकाचा फायदा घेण्यासाठी तिने सोन्याच्या तस्करी करणाऱ्या गँगशी हातमिळवणी केली आणि तस्करी सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे.