भाजपाप्रवेश निश्चित, शहांच्या भेटीसाठी राणेंची दिल्लीवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 03:29 IST2017-09-25T03:28:54+5:302017-09-25T03:29:50+5:30

राणे हे अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित असतील. या दिल्लीवारीत राणेंचा भाजपाप्रवेश निश्चित झाला..

Ranchi to meet BJP leaders, Shah Rukh Khan | भाजपाप्रवेश निश्चित, शहांच्या भेटीसाठी राणेंची दिल्लीवारी

भाजपाप्रवेश निश्चित, शहांच्या भेटीसाठी राणेंची दिल्लीवारी

मुंबई : विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे दिल्लीला निघाले असून, सोमवारी ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत. दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक तालकटोरा स्टेडियममध्ये होणार आहे. या बैठकीला भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहाणार
आहेत. बैठकीचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने समारोप होणार आहे.
ही बैठक संपल्यानंतर राणे हे अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित असतील. या दिल्लीवारीत राणेंचा भाजपाप्रवेश निश्चित झाला, तरी घोषणा मात्र ते मुंबईत पत्रपरिषद घेऊनच करतील, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Ranchi to meet BJP leaders, Shah Rukh Khan