घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 11:37 IST2025-09-20T11:36:42+5:302025-09-20T11:37:38+5:30
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने त्याच्या सख्ख्या काकीशी पोलीस ठाण्यात लग्न केलं.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने त्याच्या सख्ख्या काकीशी पोलीस ठाण्यात लग्न केलं. या घटनेनंतर काका म्हणाला की, "माझं सर्व काही उद्ध्वस्त झालं आहे, मला लुटण्यात आलं. माझ्याकडे काहीही शिल्लक नाही. हा माझा पुतण्या आहे. माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे. पोलिसांवर दबाव आणण्यात आला आणि पोलिसांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यात लग्न झालं. त्याने मर्जीने लग्न केलं आहे, जर त्यांचं काही झालं तर मला त्यात अडकवता कामा नये."
रामपूरच्या पटवाई पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका गावात ही घटना घडली. एका तरुणाचे त्याच्या काकीशी प्रेमसंबंध होते. पण काकाला याची अजिबात माहिती नव्हती, काही दिवसांनी लोकांना संशय आला. जेव्हा हे प्रेमसंबंध गावात चर्चेचा विषय बनले तेव्हा काकाला या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. त्यानंतर काकीनेही स्पष्टपणे ती आता त्याच्यासोबत राहणार नाही, तिला तिच्या पुतण्यासोबत राहायचं असल्याचं सांगितलं.
कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यानंतर काकी पटवाई पोलीस ठाण्यात गेली आणि पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याने तिच्याशी लग्न न केल्यास त्याला जेलमध्ये पाठवण्याची धमकीही दिली. त्यानंतर पोलिसांनी पुतण्याला पोलीस ठाण्यात बोलावलं. काकीने सर्वांसमोर लग्न केलं. पुतण्याला हार घातला. काकाला घटस्फोट न देता पुतण्याशी लग्न केलं आहे.
काका नूरपालला त्याची पत्नी चंचलच्या मनात काय चाललं आहे याची काहीच कल्पना नव्हती. काकी आणि पुतण्याचे तीन वर्षे प्रेमसंबंध चालू होते. शेजाऱ्यांनी ते पाहिलं पण ते गप्प राहिले. "मी आता तुमच्यासोबत राहणार नाही, पुतण्यासोबत राहणार आहे" हे ऐकून नूरपाल हताश झाला. माझं घर उद्ध्वस्त झालं आहे. माझी एकच विनंती आहे की, मला कोणत्याही प्रकरणात ओढलं जाऊ नये. मला फक्त जगायचं आहे असं नूरपालने म्हटलं आहे. सध्या गावात याच घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.