रामदास आठवलेंची 'गलती से मिस्टेक'; अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वेगळ्याच 'अमित'ला केलं टॅग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 18:05 IST2021-10-22T17:53:55+5:302021-10-22T18:05:48+5:30
Ramdas Athawale And Amit Shah : रामदास आठवले यांनी देखील अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण शुभेच्या देताना मात्र त्यांच्याकडून एक चूक झाली आहे.

रामदास आठवलेंची 'गलती से मिस्टेक'; अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वेगळ्याच 'अमित'ला केलं टॅग
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्ताने देशातील दिग्गज नेते आणि भाजपाचे अनेक मोठे नेते अमित शाह यांना सदिच्छा देत आहेत. शहा यांना विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याच दरम्यान केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे सर्वेसर्वा रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देखील अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण शुभेच्छा देताना मात्र त्यांच्याकडून एक चूक झाली आहे.
रामदास आठवले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. "केंद्रीय गृहमंत्री अमित शाहजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्यासारख्या ऊर्जावान आणि ओजस्वी गृहमंत्र्यांच्या कार्यकाळात राष्ट्राची अंतर्गत सुरक्षा मजबूत झाली आहे. तुम्हाला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करतो" असं म्हणत आठवले यांनी शुभेच्छा दिल्या आहे. पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी वेगळ्याच एका 'अमित'ला टॅग केलं आहे. अमित शाह यांच्या ऐवजी अमित जोटवानी या व्यक्तीला टॅग केलं आहे. सध्या सोशल मीडियावर रामदास आठवलेंच्या या 'गलती से मिस्टेक' ची जोरदार चर्चा रंगली आहे.
केंद्रीय गृहमंत्री श्री @Amit Shah जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। आप जैसे ऊर्जावान और ओजस्वी गृहमंत्री के कार्यकाल में राष्ट्र की आंतरिक सुरक्षा मज़बूत हुई है। आपके उत्तम स्वास्थ्य और दीर्घायु होने की कामना करता हूँ। pic.twitter.com/kOib1rI2zg
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) October 22, 2021
I have a pretty nice Twitter handle.
— Amit Jotwani 🚢 (@amit) June 4, 2021
But, I am seriously considering renaming it to -
"thisIsNotTheAmitYouAreProbablyLookingFor"
I’ll take other suggestions.
👇🏽 pic.twitter.com/VqtDBZyVab