वक्फ विधेयकाला लोकसभेची मंजुरी मिळाल्यानंतर ते राज्यसभेत मांडण्यात आले. यानंतर, तेथेही या विधेयकावर जोरदार चर्चा झाली. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास अठावले यांनी या विधेयकाला आपल्या खास शैलीत समर्थन दिले आणि विरोधकांवरही जोरदार निशाणा साधळा. अठावले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात शायरीच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधत केली. ते म्हणाले, "इतनी हो गई है रात, मैं कर रहा वक्फ बिल पर बात, मैं दे रहा मोदी जी को साथ, इसलिए कांग्रेस को दिखा रहा हाथ." यानंतर आठवले यांनी आपला मोर्चा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांच्याकडे वळवला आणि गमतिशीर अंदाजात त्यांचीही खिल्ली उडवली.आठवले आणि मोदीजी मुस्लिमांबद्दल बोलतात.मत्र काँग्रेसचे लोक त्यांच्यावर आघात करतात. मोदीजी गरिबांबद्दल बोलतात, मोदीजी नेहमीच अल्पसंख्याकांबद्दल बोलतात. याच बरोबर, खरगेंवर निशाणा साधताना ते म्हणाले, "हे असंवैधानिक नाही. संविधान बाबासाहेबांनी लिहिले आहे, तुम्हीही त्याचे अनुयायी आहात, मीही त्यांचा अनुयायी आहे. खर्गे साहेब, काँग्रेसने तुम्हाला कर्नाटकात मुख्यमंत्री बनवले नाही... मलाही मंत्री बनवले नव्हते. म्हणूनच मी येथे आलोय."
"इतनी हो गई है रात, मैं कर रहा हूं वक्फ पर बात...!" संसदेत हसत-हसत आठवलेंचा खर्गेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 10:33 IST