शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वासनेची निवृत्ती करण्यासाठी रामनामाची गरज

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

बार्शी: रामनामाला अनन्यसाधारण महत्त्व असून, रामनामाने वासना जळून जात़े वासनेची उत्पत्ती म्हणजे बंधन आणि वासनेची निवृत्ती म्हणजे मोक्ष होय, असे सांगत वासनेची निवृत्ती करण्यासाठी रामनामाची गरज असल्याचे प्रतिपादन जयवंत बोधले महाराज यांनी केल़े ते भगवंत मंदिरात र्शावणमासानिमित्त भगवंत देवस्थान व बोधराज भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या अध्यात्म रामायण या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होत़े

बार्शी: रामनामाला अनन्यसाधारण महत्त्व असून, रामनामाने वासना जळून जात़े वासनेची उत्पत्ती म्हणजे बंधन आणि वासनेची निवृत्ती म्हणजे मोक्ष होय, असे सांगत वासनेची निवृत्ती करण्यासाठी रामनामाची गरज असल्याचे प्रतिपादन जयवंत बोधले महाराज यांनी केल़े ते भगवंत मंदिरात र्शावणमासानिमित्त भगवंत देवस्थान व बोधराज भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या अध्यात्म रामायण या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होत़े
रामनामामध्ये र, अ, म ही तीन अक्षरे येतात़ र म्हणजे अग्निबीज, अग्निबीज म्हणजे पाप जाळून टाकणे, अ म्हणजे सूर्यबीज, सूर्यबीज म्हणजे प्रकाश निर्माण करणे, म म्हणजे चंद्रबीज, चंद्रबीज म्हणजे शांतता निर्माण करण़े याचा दुसरा अर्थ सांगताना महाराज म्हणाले, र म्हणजे वैराग्य, अ म्हणजे ज्ञानप्राप्ती आणि म म्हणजे भक्तीप्राप्ती़ राम म्हणत असताना रा म्हणताना ओठ उघडतात, म म्हणताना ओठ बंद होतात़ याचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की, ओठ उघडणे म्हणजे पोटातील पापे बाहेर जाण़े आणि म म्हटल्यावर ओठ बंद होणे म्हणजे बाहेरची पापे आत न येण़े राम नाम हे मोक्षदायक असून, या रामनामाने निष्कामता प्राप्त होत़े हे सांगताना संत कबीर व संत कमालाचे वचने सांगून सीता अशोक वनात असताना ती रामनामाचा जप करत होती़ ते पाहून राक्षस सुध्दा रामनामात तल्लीन होत होत़े तोंडाने राम घेणे आणि मनातल्या मनात रामनाम घेण़े याचा विचार करताना रामनामाने वासना जळून जाते, असे त्यांनी स्पष्ट केल़े रामनामामध्ये जीव विश्वरूप आहे याची जाणीव होत़े