Digvijaya Singh : Video - राहुल गांधी राम मंदिरात केव्हा येणार? दिग्विजय सिंह यांनी दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 15:08 IST2026-03-26T15:07:23+5:302026-03-26T15:08:07+5:30
Digvijaya Singh And Rahul Gandhi : रामनवमीच्या निमित्ताने काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राहुल गांधी अयोध्येला कधी येणार, यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

Digvijaya Singh : Video - राहुल गांधी राम मंदिरात केव्हा येणार? दिग्विजय सिंह यांनी दिलं उत्तर
रामनवमीच्या निमित्ताने काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राहुल गांधी अयोध्येला कधी येणार, यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. दिग्विजय सिंह म्हणाले, "प्रत्येक व्यक्ती येथे तेव्हाच येते जेव्हा त्यांना देवाचं बोलावणं येतं. मला बोलावणं आलं म्हणूनच मी येथे आलो. दर्शन घेऊन चांगलं वाटत आहे."
"जर श्रीरामाचं दर्शन घ्यायला तुम्ही येणार असाल तर हनुमानाचं दर्शनही घ्यायलाच हवं. काँग्रेसमध्ये प्रत्येक व्यक्ती आपापल्या श्रद्धेनुसार धर्माचं पालन करते. आम्ही धर्माचा वापर व्यापार किंवा राजकारणासाठी करत नाही. धर्माचा राजकीय गैरवापर होऊ नये आणि त्याचा व्यापारासाठीही वापर केला जाऊ नये. काँग्रेसमध्ये प्रत्येकजण आपल्या श्रद्धेनुसार धर्माच्या मार्गावर चालतो."
#WATCH | Senior Congress leader Digvijaya Singh says, "Every individual comes here when God calls them. When I received the 'bulava', I came here...It is not possible not to have the darshan of Hanuman ji if you come to Lord Ram...Every person in Congress follows the path of… https://t.co/o53mcMzuXFpic.twitter.com/ceQDJp3PMk
— ANI (@ANI) March 26, 2026
रामनवमीच्या शुभेच्छा देताना त्यांनी स्पष्ट केलं की, त्यांनी कधीही राम मंदिर उभारणीला विरोध केला नव्हता. "मी स्वतः मंदिर निर्माणासाठी १ लाख ११ हजार रुपयांची देणगी दिली आहे," अशी आठवणही त्यांनी करून दिली. ते पुढे म्हणाले की, "प्रभू रामाचे दर्शन घ्यायला माणूस तेव्हाच येतो जेव्हा देवाचं बोलावणं येतं. मला बोलावणं आलं आणि म्हणून मी आलो."
राहुल गांधींबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, जेव्हा त्यांना बोलावणं येईल, तेव्हा ते नक्कीच येतील, ते का येणार नाहीत? काँग्रेसमधील प्रत्येक व्यक्ती आपापल्या श्रद्धेनुसार धर्माचं पालन करते. आपला धर्म कोणताही असो, मग तो हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन किंवा पारसी असो, प्रत्येक व्यक्ती आपापल्या श्रद्धेनुसार धर्माशी संबंधित असतो. पण याचा कोणत्याही प्रकारे राजकीय गैरवापर केला जाऊ नये.
मध्यपूर्वेतील युद्धग्रस्त देशांमधील परिस्थितीबद्दल विचारले असता, दिग्विजय सिंह म्हणाले की, तुम्ही सध्याची परिस्थिती स्वतःच पाहत आहात. पेट्रोल पंपांवर आणि एलपीजी सिलिंडर खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचं देखील त्यांनी सांगितलं.