शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

राम रहिमला तुरुंगात एकटे सोडल्यास कैदी मारणार ठार, तुरुंग प्रशानाला भीती 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2017 9:28 PM

बलात्कारी बाबा राम रहीम सध्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. त्याला सध्या रोहतकमधील सुनारिया तुरुंगात ठेवण्यात आले आहे. मात्र त्याला कारागृहात एकटेच ठेवण्यात आले आहे. तुरुंगातील इतर कैदी राम रहीवर संतप्त असल्याने तसेच तो एकटा सापडल्यास त्याच्यावर या कैद्यांकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेण्यात आली असल्याचे वृत्त आहे. 

रोहतक, दि. 8 - बलात्कारी बाबा राम रहीम सध्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. त्याला सध्या रोहतकमधील सुनारिया तुरुंगात ठेवण्यात आले आहे. मात्र त्याला कारागृहात एकटेच ठेवण्यात आले आहे. तुरुंगातील इतर कैदी राम रहीवर संतप्त असल्याने तसेच तो एकटा सापडल्यास त्याच्यावर या कैद्यांकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेण्यात आली असल्याचे वृत्त आहे. लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळत आश्रमातील महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी बाबा राम रहीमला दोषी ठरवत न्यायालयाने त्याला 10 व  बलात्कार प्रकरणी दोषी आढळल्यानंतर त्याला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, बाबाला ठेवण्यात आलेल्या रोहतक कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका व्यक्तीने बाबा राम रहीमच्या सुरक्षेबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. सोमू पंडित नावाच्या एका व्यक्तीने असा दावा केला आहे की, राम रहीमच्या विरोधात तुरुंगात कैद असलेल्या कैद्यांमध्ये तीव्र संताप आहे. हा संताप एवढा तीव्र आहे की राम रहीमला तुरुंगात एकटा सोडला गेल्यास कैदी तुरुंगात राम रहीमची हत्या करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.  डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणी 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.   25 ऑगस्ट रोजी  न्यायालयाने बाबा राम रहीमला दोषी ठरवले होते.  दोषी ठरवल्यानंतर झालेला हिंसाचार लक्षात घेता तुरुंगातच न्यायालय भरवून शिक्षा सुनावण्यात आली. निकाल सुनावण्यासाठी न्यायाधीशांना विशेष हेलिकॉप्टरने रोहतकच्या तुरुंगात आणण्यात आले होते. 2002मध्ये हे प्रकरण उजेडात आले होते.  गुरमीत राम रहीमविरोधातील खटला प्रकरण2002 पासून ते आतापर्यंतचा घटनाक्रम एप्रिल 2002 : सिरसातील डेरा सच्चा सौदा येथे महिला अनुयायांचे लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार करणारे निनावी पत्र पंजाब व हरियाणा हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना लिहिण्यात आले होते.  

मे 2002 : हायकोर्टानं सिरसा जिल्हा आणि सत्र न्यायालयाला डेरा सच्चा सौदाविरोधात पत्राद्वारे करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यास सांगितले.

सप्टेंबर 2002 : महिला अनुयायांचं लैंगिक शोषण होत असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर हायकोर्टानं पुढील चौकशीसाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले.

डिसेंबर 2002 : सीबीआयनं डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीमविरोधात बलात्कार व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

जुलै 2017 : सीबीआयनं अंबाला कोर्टात गुरमीत राम रहीमविरोधात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात 1999 ते 2001 यादरम्यान दोन साध्वींचे (महिला अनुयायी) लैंगिक शोषण करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.

सप्टेंबर 2008 : सीबीआयच्या विशेष न्यायालयानं गुरमीत राम रहीमविरोधात कलम 376 (बलात्कार) आणि 506  (धमकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

2009 ते 2010 दरम्यान तक्रारकर्त्यांनी कोर्टासमोर आपला जबाब नोंदवला

एप्रिल 2011 : गुरमीत राम रहीमविरोधातील खटला प्रकरण अंबाला कोर्टातून पंचकुला सीबीआय कोर्टाकडे वर्ग करण्यात आला.

जुलै 2017 :  विशेष सीबीआय न्यायालयाकडून नियमित सुनावणीचे आदेश

ऑगस्ट 17, 2017 :  फिर्यादी व बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण. पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी शिक्षा सुनावण्यासाठी 25 ऑगस्टची तारीख निश्चित केली. 

ऑगस्ट 25, 2017 : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कारप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले. 

ऑगस्ट 28, 2017 : गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणी 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. 

टॅग्स :Baba Ram Rahimबाबा राम रहीमIndiaभारतCrimeगुन्हा