शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

Ram Mandir Bhumipujan :"हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव आणि हिंदुत्वाचा विजय’’ ओवेसींनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 5:06 PM

पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाला विरोध करणाऱ्या असदुद्दीन ओवेसींनी भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर आपला संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देनरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन करून पद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं आजचा दिवस हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पराभवाचा आणि हिंदुत्वाच्या विजयाचा दिवसअयोध्येतील बाबरी मशिदीच्या पतनासाठी काँग्रेसही तितकीच जबाबदार

हैदराबाद - अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन करून पद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं आहे, आजचा दिवस हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पराभवाचा आणि हिंदुत्वाच्या विजयाचा दिवस आहे, असे ओवेसींनी म्हटले आहे.पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाला विरोध करणाऱ्या असदुद्दीन ओवेसींनी भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, भारत हा एक सेक्युलर देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन करून पद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं आहे, आजचा दिवस हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पराभवाचा आणि हिंदुत्वाच्या विजयाचा दिवस आहे.

दरम्यान, ओवेसी यांनी अयोध्येतील बाबरी मशिदीच्या पतनावरून काँग्रेसवरही घणाघाती टीका केली. अयोध्येतील बाबरी मशिदीच्या पतनासाठी काँग्रेसही तितकीच जबाबदार आहे. देशातील सेक्युलर पक्षांचं पितळ पूर्णपणे उघडं पडलं आहे, अशा शब्दात ओवेसी यांनी आपला संताप व्यक्त केला. आज आपण खूप भावूक झालो आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. मात्र मीसुद्धा तितकाच भावूक झालो आहे. सौहार्द आणि नागरिकत्वामधील समानतेवर माझा विश्वास आहे. मात्र आज ४५० वर्षांपासून तिथे उभ्या असलेल्या मशिदीसाठी मी भावूक झालो आहे, असे ओवेसी म्हणाले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदी