शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

Ram Mandir Bhumi Pujan : "आजचा दिवस ऐतिहासिक, राम मंदिरामुळे देशात 'रामराज्य' येणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 8:43 AM

Ram Mandir Bhumi Pujan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे.

नवी दिल्ली - राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. कार्यक्रमाला जवळपास 175 संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार असले तरी हा सोहळा सर्वांना दूरदर्शनवरून थेट पाहता येणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. योगगुरू बाबा रामदेवही अयोध्येत दाखल झाले असून हनुमानगढी येथे उपस्थित आहेत. 

राम मंदिरासोबतच देशात रामराज्य येणार असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाआधी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "आजचा दिवस हा एक ऐतिहासिक दिवस आहे. हा दिवस कायमच सर्वांच्या लक्षात राहील. मला खात्री आहे की, राम मंदिरामुळे देशात 'रामराज्य' स्थापित होईल" असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी शहर पूर्णपणे भगव्या रंगात सजले आहे. परिसर सुशोभित करण्यात आला असून जागोजागी प्रभू रामचंद्राच्या प्रतिमा असलेले फलक लावण्यात आले आहेत. शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

असा असणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संपूर्ण कार्यक्रम

- 5 ऑगस्ट रोजी सकाळी 9.35 वाजता दिल्लीहून प्रस्थान

- 10.35 वाजता लखनऊ विमानतळावर लॅडिंग

- 10.40 हेलिकॉप्टरने अयोध्येसाठी रवाना होणार

- 11.30 वाजता अयोध्याच्या साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर लॅंडिंग

- 11.40 वाजता हनुमानगढी येथे पोहचणार त्यानंतर 10 मिनिटे दर्शन आणि पूजा

- 12 वाजता राज जन्मभूमी परिसरात पोहचणार

- रामलल्लांचे दर्शन आणि पूजा

-12.15 वाजता रामलाला परिसरात पारिजातचे वृक्षारोपण

-12.30 वाजता भूमिपूजन कार्यक्रमाला सुरुवात

-12.40 वाजता राम मंदिर आधारशिलाची स्थापना

- 2.05 वाजता साकेत कॉलेजच्या हेलिपॅडकडे प्रस्थान

- 2.20 वाजता लखनऊमधून हेलिकॉप्टरने प्रस्थान

- लखनऊवरून दिल्लीसाठी रवाना होणार

पंतप्रधान मोदी दुपारी सव्वाबारा वाजता मंदिराचे भूमिपूजन करतील. त्याआधी ते हनुमानगढीला भेट देणार असून, रामलल्ला विराजमानचेही दर्शन घेणार आहेत. देशात बहुधा प्रथमच एखाद्या पंतप्रधानांच्या हस्ते मंदिराच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन होतं असल्याने रामभक्त आणि श्रद्धाळू अत्यंत आनंदात आहेत. अयोध्येत 5 ऑगस्टला दिवाळी असेल, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात शहरात दीपोत्सव, रांगोळ्या, सर्वत्र सजावट, पूजाअर्चा, आरत्या, शंखनाद, फुलांच्या झळकणाऱ्या माळा यांमुळे प्रत्यक्ष दिवाळी सुरू झाल्याचेच भासत आहे. प्रत्येक जण एकमेकांचे स्वागत जय श्रीरामच्या घोषणेने करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर मोदी देशाला संबोधित करणार, असा असेल संपूर्ण कार्यक्रम

CoronaVirus News : लय भारी! फक्त 30 सेकंदांत आवाजावरून समजणार कोरोना आहे की नाही?, जाणून घ्या कसं

CoronaVirus News : लढ्याला यश! Jubilant ने लाँच केलं कोरोनावरचं औषध, जाणून घ्या किंमत अन् बरंच काही...

CoronaVirus News : "हर्ड इम्युनिटी' हा कोरोनावरचा यशस्वी उपाय नाही'; नव्या रिसर्चमधून मोठा खुलासा

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याBaba Ramdevरामदेव बाबाNarendra Modiनरेंद्र मोदी