शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Ram Mandir Bhumi Pujan: भूमिपूजनाला आडवाणी, जोशींची अनुपस्थिती; भाजपा नेत्याकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 11:06 AM

Ram Mandir Ayodhya: राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचं लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशींना निमंत्रण नाही

अयोध्या: राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा थोड्याच वेळात संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार आहे. त्यासाठी पंतप्रधान लखनऊमध्ये दाखल झाले आहेत. मात्र या कार्यक्रमाला भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह यांना निमंत्रित करण्यात आलेलं नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि या नेत्यांचं वय पाहून त्यांना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यावरून भाजपाचे माजी खासदार विनय कटियार यांनी नाराजी व्यक्त केली. राम मंदिर आंदोलनात आडवाणी आणि जोशी यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे त्यांनी भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहावं यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज होती, असं मत कटियार यांनी व्यक्त केलं.कोरोना विषाणूचा धोका वाढत असल्याची जाणीव मला आहे. पण तरीही आडवाणी आणि जोशी यांना अयोध्येला आणण्याचे प्रयत्न करायला हवे होते. त्यांना अयोध्येला आणण्याची व्यवस्था करायला हवी होती. त्यांना विशेष विमानानं बोलवायला हवं होतं, असं कटियार म्हणाले. राम मंदिर भूमिपूजनासाठी ९० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्ती आल्यास त्यांची व्यवस्था करणं अवघड होईल, असं राम मंदिर ट्रस्टकडून कालच सांगितलं गेलं. त्यावर कटियार यांनी भाष्य केलं.माझं वय ६५ वर्ष आहे. मी भूमिपूजन सोहळ्याला जाणार आहे. मात्र माझी व्यवस्था करण्यात यावी. तरच मी अयोध्येला जाईन, असं कटियार म्हणाले. मला पाठदुखीचा त्रास आहे. मी जास्त पायी चालू शकत नाही. त्यामुळे मला फार चालावं लागू नये, अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात यावी, असंदेखील कटियार यांनी पुढे म्हटलं.आडवाणी, जोशींची प्रमुख भूमिकालालकृष्ण आडवाणी यांची राम जन्मभूमी आंदोलनात अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढण्यात आली होती. आडवाणी, जोशी यांच्यासह उमा भारती यांचंही राम मंदिर आंदोलनात मोठं योगदान आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी घडलेल्या घटनेनंतर न्यायालयात खटला दाखल झाला. त्यात या तिन्ही नेत्यांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदीLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणी