शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रक्षकच बनले भक्षक, पोलिसांनी केला महिलेवर बलात्कार

By admin | Updated: June 12, 2014 11:39 IST

जनतेच्या रक्षणाची जबाबादारी असणा-या पोलिसांनीच एका महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

 ऑनलाइन टीम

लखनौ, दि. १२ -  उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचाराचे सत्र अद्याप सुरूच असून जनतेच्या रक्षणाची जबाबादारी असणा-या पोलिसांनीच एका महिलेवर पोलीस स्टेशनच्या आवारात बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. 
उत्तर प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यातील सुमेरपूर पोलिस स्टेशनमध्ये चार पोलिस कर्मचा-यांनीच महिलेवर बलात्कार केला. एका गुन्ह्यात कैद असलेल्या पतीला भेटण्यासाठी पीडित महिला तुरूंगात गेली असता  बंदूकीचा धाक दाखवत पोलिस ठाण्याच्या प्रमुखांसह चार जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित महिलेने हमीरपूरचे पोलिस अधिक्षक वीरेंद्र शेखर यांच्याकडे जाऊन झाला प्रकार कथन करत तक्रार दाखल केली.  तिच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्याच्या प्रमुखाला अटक करण्यात आली आहे. तर, अन्य तीन कर्मचा-यांचा शोध घेण्यात येत आहे
उत्तर प्रदेशातील बदायूँ जिल्ह्यात नुकतेच दोन मुलींवर बलात्कार करून  त्यांचे मृतदेह झाडावर लटकवल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. तर बुधवारी बहारीच येथे एका ४५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिला झाडावर लटकवण्यात आले होते. 
 
मुरादाबादमध्ये १६ वर्षीय मुलीची झाडावर लटकवून हत्या
मुरादाबाद येथे एका मुलीच्या हत्येचे प्रकरण समोर आले असून तिचा मृतदेह झाडावर टांगलेल्या अवस्थेत आढळला. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. काल संध्याकाळपासून ही मुलगी बेपत्ता झाली होती.