त्र्यंबक ध्वजारोहणाला राजनाथसिंह
By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:51+5:302015-07-10T21:26:51+5:30
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त पुरोहित संघाच्या धर्मध्वजारोहणास उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी होकार दर्शविला असून, त्र्यंबकेश्वरी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते, तर नाशिकला केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक हे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार की नाही याबाबत अनिश्चिता आहे.

त्र्यंबक ध्वजारोहणाला राजनाथसिंह
न शिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त पुरोहित संघाच्या धर्मध्वजारोहणास उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी होकार दर्शविला असून, त्र्यंबकेश्वरी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते, तर नाशिकला केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक हे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार की नाही याबाबत अनिश्चिता आहे. त्र्यंबकेश्वरच्या पुरोहित संघाने काही महिन्यांपूर्वीच राजनाथसिंह यांना धर्मध्वजारोहणाचे निमंत्रण दिले होते, तर नाशिकच्या पुरोहित संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरुण जेटली यांना निमंत्रण दिले; परंतु त्याऐवजी श्रीपाद नाईक यांनी येण्याचे मान्य केले आहे. राजनाथसिंह सोमवारी रात्रीच नाशिकमध्ये मुक्कामी येऊन पहाटे त्र्यंबकेश्वरला रवाना होतील. तेथून परतल्यानंतर सकाळी साडेआठ वाजता पुन्हा विशेष विमानाने ओझरहून दिल्लीला रवाना होणार आहेत.