शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

राजस्थानमधील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची मुसंडी, भाजपाला अपक्षांपेक्षा कमी जागा

By बाळकृष्ण परब | Updated: December 14, 2020 08:00 IST

Rajasthan Election : राजस्थानमधील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालांमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे.

ठळक मुद्देराजस्थानमधील ५० शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ११ डिसेंबर रोजी मतदान झाले होतेएकूण १७७५ प्रभागांच्या मतमोजणीत काँग्रेसला ६२० तर भाजपाला ५४८ ठिकाणी मिळाला विजय बसपाला ७, सीपीआयला २, सीपीआय (एम), आरएलपीचा एक आणि ५९५ अपक्षांना विजय मिळाला

जयपूर - राजस्थानमधील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालांमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसला एकूण ६२० प्रभागांमध्ये विजय मिळाला आहे. तर भाजपा तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. भाजपाला ५४८ प्रभागांत विजय मिळाला. भाजपापेक्षा अधिक प्रभागांमध्ये अपक्षांनी बाजी मारली. अपक्ष उमेदवारांना ५९५ प्रभागांत विजय मिळाला.राजस्थानमधील ५० शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ११ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. एकूण १७७५ प्रभागांमध्ये ही निवडणूक झाली होती. निवडणूक आयुक्त पी.एस. मेहरा यांनी सांगितले की, ११ डिसेंबर रोजी ५० स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान झाले होते. ज्यामध्ये एकूण ७९.९० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीची मतमोजणी रविवारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुख्यालयांमध्ये झाली. या मतमोजणीत एकूण १७७५ प्रभागांच्या मतमोजणीत काँग्रेसला ६२० तर भाजपाला ५४८ ठिकाणी विजय मिळाला. बसपाला ७, सीपीआयला २, सीपीआय (एम), आरएलपीचा एक आणि ५९५ अपक्षांना विजय मिळाला. दरम्यान. या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्विटमध्ये गहलोत म्हणाले की, नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा. काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून काँग्रेसला विजयी केल्याबद्दल मी राज्यातील जनतेचे आभार मानतो. दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सतीश पुनिया यांनी सांगितले की, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने दिखाऊ आनंद व्यक्त करावा. मात्र राज्यात सत्ता असतानाही भाजपा आणि अपक्षांची संख्या एकत्र केली तर हा जनादेश नक्कीच सत्ताविरोधी आहे.

 

टॅग्स :Rajasthanराजस्थानElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा