शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

राजस्थानच्या राजसमंदमध्ये पोलिसावर तलवारीने हल्ला; NIA ने हाती घेतला उदयपूर प्रकरणाचा तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 17:06 IST

Udaipur Murder: उदयपूर प्रकरणातील दोन्ही आरोपींविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दहशतवादी दृष्टिकोनातूनही तपास केला जात आहे.

उदयपुर:राजस्थानच्या उदयपूरमध्ये टेलर कन्हैयालालच्या हत्येवरून झालेल्या गदारोळात राजसमंदच्या भीमा भागात पोलीस कॉन्स्टेबलवर तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. उदयपूर घटनेच्या विरोधात भीमा भागात लोक निदर्शने करत होते. पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना अडवले असता जमावातील एका व्यक्तीने तलवारीने गळ्यावर हल्ला केला. यानंतर गंभीरावस्थेत कॉन्स्टेबलला अजमेरला रेफर करण्यात आले आहे. 

कॉन्स्टेबल संदीप चौधरी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाचीची झाली. यानंतर परिसरात तणाव वाढला, लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आंदोलकांनीही यावेळी पोलिसांवर दगडफेक केली. विशेष म्हणजे, दोन्ही कन्हैयायाल यांचे मारेकरी याच भीमामध्ये पकडले गेले आहेत.

NIA प्रकरणाचा तपास करणारदरम्यान, उदयपूरमधील प्रकरणाचा तपास NIA ने  हाती घेतला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, या प्रकरणाचा दहशतवादी दृष्टिकोनातूनही तपास केला जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही आज संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावून परिस्थितीवर चर्चा करणार आहेत. 

कन्हैयालालच्या अंत्ययात्रेला लोक जमले होतेमंगळवारी हत्या झालेल्या कन्हैयालालवर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील कर्फ्यूनंतर त्यांच्या शेवटच्या प्रवासासाठी मोठी गर्दी जमली होती. लोकांनी मारेकऱ्यांना फाशी द्या अशा घोषणा दिल्या. कन्हैयाच्या हत्येच्या निषेधार्थ शहरही बंद ठेवण्यात आले होते. 

कन्हैयाची हत्या कशी आणि का झाली?10 दिवसांपूर्वी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या कन्हैयालालची तालिबानी पद्धतीने हत्या करण्यात आली. मंगळवारी भरदिवसा रियाझ अन्सारी आणि मोहम्मद घौस दुकानात शिरले आणि कपडे शिवण्याच्या बहाण्याने कन्हैयालालवर तलवारीने अनेक वार करून गळाही चिरला. यानंतर कालच पोलिसांनी आरोपींना राजसमंद येथून अटक केली. याशिवाय अन्य 3 जणांनाही पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये पोलिसात तक्रार करणारा कन्हैयालालचा शेजारी नाझीमही आहे.

शरीरावर 26 खुणा, गळ्यावर 8 ते 10 वारबुधवारीच कन्हैयालालचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीरावर 26 जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. 8 ते 10 जखमा फक्त गळ्यावर होत्या. कन्हैयाचा गळा चिरून वेगळा केल्याचे पीएम रिपोर्टमध्ये समोर आले आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस