Rajasthan: २० वर्षांपासून खतरनाक सापांना पकडत होता स्नेकमॅन, अखेर कोब्राने दंश केला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 13:18 IST2022-09-12T13:18:56+5:302022-09-12T13:18:56+5:30
Rajasthan: बिकानेर विभागातील चुरू जिल्ह्यातील सरदारशहर परिसरामध्ये गेल्या २० वर्षांपासून विषारी सापांना पकडण्यासाठी प्रसिद्ध असलेले स्नेक कॅचर विनोद तिवारी यांचा कोब्राने दंश केल्याने मृत्यू झाला आहे.

Rajasthan: २० वर्षांपासून खतरनाक सापांना पकडत होता स्नेकमॅन, अखेर कोब्राने दंश केला आणि...
जयपूर - बिकानेर विभागातील चुरू जिल्ह्यातील सरदारशहर परिसरामध्ये गेल्या २० वर्षांपासून विषारी सापांना पकडण्यासाठी प्रसिद्ध असलेले स्नेक कॅचर विनोद तिवारी यांचा कोब्राने दंश केल्याने मृत्यू झाला आहे. शनिवारी एका कोब्रा सापाला पकडत असताना या सापाने विनोद तिवारी यांच्या बोटाला दंश केला. त्यामुळे तिवारी यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे कोब्राला पकडताना झालेली ही दुर्घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
सर्पमित्र म्हणून परिचित असलेले विनोद तिवारी गेल्या सुमारे २० वर्षांपासून सापांना पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम करत आहेत. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार तिवारी यांचा साप पकडण्यामध्ये हातखंडा होता. ते एकाच वेळा पाच ब्लॅक कोब्रा सापांना नियंत्रित करायचे. ते सापांना वाचवण्यासाठी स्वत: पोहोचायचे. तसेच ते सर्पाना सहजपणे रेस्क्यू करून जंगलात सोडायचे.
विनोद तिवारी यांना शनिवारी सरदारशहर येथे श्रीराम मंदिराजवळ ठेवलेल्या कचरापेटीखाली साप असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते या सापाला पकडण्यासाठी पोहोचले. त्यांनी सहजपणे या सापावर नियंत्रण मिळवले. मात्र या सापाला थैलीत सोडत असताना त्याने तिवारी यांच्या बोटाला दंश केला.
त्यानंतर त्यांनी थैली बंद करून बोट चोखून विष बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आज आपला जीव धोक्यात असल्याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी मंदिरात नमस्कार केला. मात्र अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.