शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांच्या बंडावर राहुल गांधींचं अप्रत्यक्ष भाष्य; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 6:50 PM

Rajasthan Political Crisis: पायलट यांचा उल्लेख न करता राहुल गांधींचं सध्याच्या घडामोडींवर भाष्य

नवी दिल्ली: काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या बंडामुळे राजस्थानात काँग्रेसच्या अडचणी (Rajasthan Political Crisis) वाढल्या आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं सरकार अल्पमतात असल्याचा दावा करत पायलट यांनी त्यांना थेट बहुमत सिद्ध करून दाखवण्याचं आव्हान दिलं. मात्र आपण भाजपामध्ये जाणार नसल्याचं पायलट यांनी स्पष्ट केलं आहे. या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधींनी (Rahul Gandhi) अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे.मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना आव्हान देऊन सरकारला धोका पोहोचवल्याप्रकरणी काँग्रेसनं काल सचिन पायलट यांच्यावर कारवाई केली. पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्षापदावरून दूर करण्यात आलं. या सगळ्या घडामोडींवर राहुल यांनी आज एनएसयूआयच्या बैठकीत अप्रत्यक्ष भाष्य केलं. 'कोणालाही पक्ष सोडायचा असल्यास ते तसं करू शकतात. त्यामुळे तुमच्यासारख्या नेत्यांना संधी मिळते,' असं राहुल गांधींनी एनएसयूआयच्या बैठकीत म्हटल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिली आहे.बंडखोर आमदारांना नोटीसराजस्थानात सत्ता संघर्ष सुरू असताना काँग्रेसनं बंडखोर आमदारांना नोटीस पाठवली आहे. व्हिपचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची तयारी पक्षानं केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी त्यांना नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे. यामध्ये पायलट यांच्यासह १९ आमदारांचा समावेश आहे.गांधी कुटुंबाशी असलेले संबंध बिघडवण्याचे प्रयत्नउपमुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आल्यानंतर सचिन पायलट यांनी अद्याप पत्रकार परिषद घेतलेली नाही. आपण आजही काँग्रेसी आहोत आणि भाजपामध्ये जाणार नाही. भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा केवळ माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी केल्या जात असल्याचं पायलट यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं. राजस्थानमधील काही स्वपक्षीय नेते माझे पक्ष नेतृत्त्वासोबतचे संबंध बिघडवण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपा