शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

Rajasthan political crisis: मुख्यमंत्री गेहलोतांनी थेट पंतप्रधान मोदींनाच लिहिलं पत्र; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 21:39 IST

मुख्यमंत्री अशोक गेहलोतांनी हे पत्र 19 जुलैला लिहिले होते. ते आता समोर आले आहे. गहलोतांनी मध्य प्रदेशातील सरकार पाडल्याचाही उल्लेख या पत्रात केला आहे. ते म्हणाले, कोरोना काळात कमलनाथ सरकारदेखील भाजपाच्या कटामुळेच पडले आहे.

ठळक मुद्देराजस्थानातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोतांनी हे पत्र 19 जुलैला लिहिले होते. ते आता समोर आले आहे.गहलोतांनी मध्य प्रदेशातील सरकार पाडल्याचाही उल्लेख या पत्रात केला आहे.

जयपूर -राजस्थानातील राजकीय संकट वाढतच चालले आहे. यासंदर्भात आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र लिहिले आहे. या पत्रात, निवडून आलेले सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे गेहलोतांनी म्हटले आहे. 

सरकार पाडण्यात भारतीय जनता पार्टीचे नेते सामील आहेत. या कटात केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचा हात आहे. आमच्या पक्षातील अति महत्वकांक्षी नेतेही यात सहभागी आहेत. एवढेच नाही, तर आमदारांचा घोडेबाजार करून सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचेही गेहलोत यांनी या पत्रात म्हटले आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोतांनी हे पत्र 19 जुलैला लिहिले होते. ते आता समोर आले आहे. गहलोतांनी मध्य प्रदेशातील सरकार पाडल्याचाही उल्लेख या पत्रात केला आहे. ते म्हणाले, कोरोना काळात कमलनाथ सरकारदेखील भाजपाच्या कटामुळेच पडले आहे.

गेहलोत म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात जनतेची मदत करणे ही आमची प्राथमिकता आहे. मात्र, राज्यातील जनतेने निवडून आलेले सरकार पाडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आमचे सरकार सूशासन देत आपला कार्यकाळ पूर्ण करेल. तत्पूर्वी काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी पक्षात बंडखोरी केल्याने गेहलोतांची शुर्ची धोक्यात आली आहे.

गेहलोतांच्या भावाच्या घरावर ईडीचा छापा -राजस्थानात राजकीय संघर्ष सुरू असतानाच, अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे मोठे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या जोधपूरमधील मंडोर येथील घरावर फर्टिलायझर गोटाळाप्रकरणी छापा टाकला. यावेळी ईडीचा चमू पीपीई किट घालून त्यांच्या घरी पोहोचला होता. यापूर्वी गैहलोतांच्या निकटवर्तीय काँग्रेस नेत्यांच्या घरावरही ईडीने छापेमारी केली होती.

संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेसह पोहोचला ईडीचा चमू -ईडीचा चमू संपूर्म सुरक्षा व्यवस्थेसह सीएम गेहलोत यांचे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या ठिकानांवर पोहोचला होता. ईडीने अग्रसेन गेहलोत यांच्या मंडोर येथील घराशिवाय त्यांचे पाटवा येथील कार्यालय आणि दुकानावरही तपास सुरू केला. कारवाईदरम्यान केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाचे जवानही तैनात करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या -

युद्धाचे ढग! अमेरिकेनं दिला दूतावास बंद करण्याचा आदेश; चीनची पलटवार करण्याची धमकी 

फर्टिलायझर घोटाळा : CM गेहलोतांच्या भावाच्या घरावर ED चा छापा, PPE किट घालून पोहोचला चमू

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus : वैज्ञानिकांचा दावा!; कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या 'या' औषधाने, फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा

CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?

आई शप्पथ!...रशियातील काही उद्योगपती, नेत्यांनी एप्रिलमध्येच घेतली कोरोनावरील लस

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसSachin Pilotसचिन पायलट