धक्कादायक! एकाच मुलीवर प्रेम जडलेल्या चुलत भावांची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 11:46 AM2021-03-09T11:46:52+5:302021-03-09T11:49:50+5:30

राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील धक्कादायक घटना; पोलिसांकडून तपास सुरू

rajasthan In love with same girl 2 cousins end their lives film video before taking extreme step | धक्कादायक! एकाच मुलीवर प्रेम जडलेल्या चुलत भावांची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

धक्कादायक! एकाच मुलीवर प्रेम जडलेल्या चुलत भावांची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

Next

कोटा: दोन चुलत भावंडांनी रेल्वे रुळांवर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात घडली आहे. चालत्या रेल्वेसमोर उडी मारून दोन भावांनी जीवन संपवलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवराज गुर्जर (वय २३ वर्षे) आणि महेंद्र गुर्जर (वय २३ वर्षे) अशी आत्महत्या केलेल्या तरुणांची नावं आहेत. हे दोघे दबलाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या केशवपुरा गावचे रहिवासी आहेत. देवराज आणि महेंद्र एकाच मुलीच्या प्रेमात होते. त्यांच्या हातावर 'आशा' नाव आढळून आलं. दोघांचे मृतदेह दिल्ली-मुंबईला जोडणाऱ्या रेल्वे रुळांजवळ छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले.

स्वत:वर गोळी झाडून घेणाऱ्या आयुषचा व्हिडीओ, म्हणाला - 'पत्नीचं आधीही लग्न झालंय, ब्लॅकमेल करते....'

रेल्वे रुळांवर आत्महत्या करण्यापूर्वी दोन्ही भावांनी त्यांच्या मोबाईलवर एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. आम्ही उचलणार असलेल्या पावलासाठी आमच्यावर कोणीही कोणत्याही प्रकारचा दबाव आणलेला नाही, असं दोघांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. 'आम्ही आमचा निर्णय घेतला आहे. मी उचलेल्या पावलासाठी त्याला आणि त्यानं उचलेल्या पावलासाठी मला जबाबदार धरू नये,' असं आवाहन त्यांनी व्हिडीओतून कुटुंबीयांना केलं आहे.

आमच्या मृत्यूनंतर कुटुंबानं कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन भावंडांनी केलं आहे. मुलीसाठी योग्य जोडीदार शोधा आणि तिचं लग्न लावून द्या, असंदेखील दोन भावंडांनी व्हिडीओच्या शेवटी म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी कलम १७४ खाली गुन्ह्याची नोंद केली आहे. सध्या पोलीस घटनेचा तपास करत आहेत. शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर दोन्ही भावांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले.

Web Title: rajasthan In love with same girl 2 cousins end their lives film video before taking extreme step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.