शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

अमित शाह यांनी सांगितली पंडित जवाहरलाल नेहरूंची सर्वात मोठी चूक; केला बडा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 11:25 IST

काँग्रेसला निशाण्यावर घेत अमित शाह म्हणाले, गेल्या दहा वर्षांपूर्वी देशात यूपीए सरकार होते. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी देशाचे भविष्य अंधकारमय केले होते.

भारतीय जनता पक्षाने स्थापनेवेळी जनतेला जी आश्वासने दिली होती, ती सर्व आश्वासने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आहेत. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जम्मू काश्मीरमध्ये आर्टिकल 370 लागू करून जी सर्वात मोठी चूक केली होती. ती चूक केंद्रातील मोदी सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी संपुष्टात आणली आणि जम्मू काश्मीरात तिरंगा फडकला, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते राजस्थानातील जयपूरमध्ये बोलत होते.

शाह म्हणाले, ''भाजप हा एक असा पक्ष आहे, जो नेत्याच्या बळावर नाही, तर बूथवरील आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकतो. नरेंद्र मोदी यांनी जगात भारताचा डंका वाजविण्याचे काम केले आहे. यामुळे संपूर्ण देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा निवडून पंतप्रधान बनविण्यासाठी तयार आहे.''

सोनिया गांधी आणि मनमोहन सिंगांवरही केलं भाष्य -काँग्रेसला निशाण्यावर घेत अमित शाह म्हणाले, गेल्या दहा वर्षांपूर्वी देशात यूपीए सरकार होते. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी देशाचे भविष्य अंधकारमय केले होते. 2014 मध्ये देशातील आणि राजस्थानच्या जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्याचे काम केले आणि 10 वर्षात पंतप्रधान मोदींनी देशातील प्रत्येक क्षेत्रात बदल घडवून आणला.

काय म्हणाले अमित शाह? - अमित शाह म्हणाले, 2014 मध्ये 55% मतदानासह 25 च्या 25 जागाही राजस्थानातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्या होत्या. त्यानंतर, 2019 मध्ये मतांची टक्केवारी वाढून 61% झाली. पुन्हा सर्वच्या सर्व 25 जागा भाजपला मिळाल्या. आता पुन्हा नरेंद्र मोदी आले आहेत. यावेळी 70% मतांसह 25 च्या 25 ही जागा जिंकून हॅट्रिक लगणार आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहBJPभाजपाJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी