अडचणीत मदतीला धावली खाकी; चादरीची भिंत उभारुन रस्त्यावर केली महिलेची प्रसुती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 03:11 PM2020-05-07T15:11:16+5:302020-05-07T15:29:59+5:30

या महिलेने प्रवासादरम्यान रस्त्यावरच बाळाला जन्म दिला आहे.

Rajasthan jodhpur woman gave birth to a child in a car at akhilya circle myb | अडचणीत मदतीला धावली खाकी; चादरीची भिंत उभारुन रस्त्यावर केली महिलेची प्रसुती

अडचणीत मदतीला धावली खाकी; चादरीची भिंत उभारुन रस्त्यावर केली महिलेची प्रसुती

Next

सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे कधीही न उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना सगळ्यांनाच करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही सेवा सुरू नाहीत. त्यामुळे अनेकांची गैरसोय होताना दिसून येत आहे. अशा स्थितीत पोलीस गरजूंना मदत करून तर कधी अन्नदाता बनून लोकांना आधार देत आहेत. राजस्थानमध्ये सुद्धा असाच प्रकार घडला आहे. 

तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता की, पोलीसांनी या महिलेची मदत केली आहे. राजस्थानमधील महिला पोलीस उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिलेने कार प्रवासादरम्यान बाळाला जन्म दिला आहे. रुग्णालयात पोहोचण्याआधीच या महिलेची प्रकृती गंभीर झाली होती.  प्रिती चंद्रा ही महिला ४ मे ला आपल्या पतीसोबत राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातून जोधपूरच्या रस्त्यावर कारने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान या महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या. त्यावेळी कार चालकाने कार अखिल्या सर्कल जवळ थांबवली. त्याच परिसरात काही महिला पोलिस कॉन्सटेबल उपस्थित होते. (हे पण वाचा-लॉकडाऊनमध्ये वेळ जात नाही; म्हणून 'हा' आवलिया ४० दिवस शरीरावर काढत बसला टॅटू)

या महिला कॉस्टेबलने  गरोदर महिलेला होत असलेल्या प्रसुती कळा लक्षात घेता एका डॉक्टरला आणि नर्सला तातडीने बोलावून घेतले. पण त्या महिलेला असह्य वेदना होत होत्या. त्यामुळे मेडीकल स्टाफ पोहोचण्याआधीच पोलीस कॉस्टेबलने रस्त्यावर चादरीची भिंत उभारून या महिलेची प्रसुती केली.  या महिलेने बाळाला सुखरूप जन्म दिल्यानंतर  बाळाला आणि आईला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (हे पण वाचा-मुकी जनावरं उपाशी राहू नयेत; म्हणून 'हा' रोज करतोय २० किलोमीटर प्रवास)

Web Title: Rajasthan jodhpur woman gave birth to a child in a car at akhilya circle myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.