"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 15:47 IST2025-05-11T15:46:19+5:302025-05-11T15:47:28+5:30
पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील सुरेंद्र मोगा शहीद झाले.

"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील सुरेंद्र मोगा शहीद झाले. त्यांची ११ वर्षांची मुलगी वर्तिका हिने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे. माझे पप्पा खूप चांगले होते. शत्रूंचा खात्मा करून ते स्वतः शहीद झाले. माझ्या पप्पांनी देशाचं रक्षण केलं आहे. मी रात्री ९ वाजता पप्पांशी शेवटचे बोलले होते. मी पप्पांना सांगितलेलं की, इथे ड्रोन उडत आहेत, पण कोणतेही हल्ले होत नाहीत. आम्ही सर्व सुरक्षित आहोत."
"पाकिस्तानचा खात्मा झाला पाहिजे. मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि माझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेईन. मी दहशतवाद्यांना मारेन." रविवारी शहीद सुरेंद्र मोगा यांचं पार्थिव झुंझुनू येथील मांडवा येथे पोहोचलं. मांडवा शहरातील बिसाऊ क्रॉसिंगवरून त्यांचे पार्थिव मेहरादासी गावात आणलं. यावेळी मोठ्या संख्येने तरुण आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सुरेंद्र मोगा यांचे वडीलही होते सैन्यात
शहीद सुरेंद्र मोगा यांचे वडीलही सैन्यात होते. तीन मोठ्या बहिणींव्यतिरिक्त, कुटुंबात सर्वात धाकटा भाऊ, ११ वर्षांची मुलगी, पत्नी आणि ७ वर्षांचा मुलगा आहे. सुरेंद्र यांची १ जानेवारी २०१० रोजी भारतीय हवाई दलात निवड झाली. त्यांनी राजस्थान पब्लिक स्कूल आणि झुनझुनू येथील जीआर पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं. यानंतर त्यांनी झुंझुनूच्या मोरारजी कॉलेजमधून बीएससी केलं. ते उधमपूर हवाई तळावर तैनात होते आणि पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात ते शहीद झाले.
"पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, "दहशतवाद हा कुत्र्याचं शेपूट आहे, जे कधीही सरळ होणार नाही. त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. आम्ही ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी दोनशे एकर जमीन दिली. आता येथे ब्रह्मोसचे उत्पादन सुरू होईल. ऑपरेशन सिंदूरमध्ये तुम्ही ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ताकद पाहिली असेल. जर तुम्ही ती पाहिली नसेल तर पाकिस्तानी लोकांना विचारा ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"
"पंतप्रधानांनी जाहीर केलं आहे की, कोणतीही दहशतवादी घटना आता युद्ध मानली जाईल आणि लक्षात ठेवा की जोपर्यंत आपण दहशतवाद पूर्णपणे खात्मा करत नाही तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही. आता याला चिरडून टाकण्याची वेळ आली आहे, आपण सर्वांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, संपूर्ण भारत आणि संपूर्ण उत्तर प्रदेशच्या एकत्र या मोहिमेत सामील व्हायचं आहे."