सत्ता संघर्ष : राजस्थानात 14 ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन, सरकारच्या प्रस्तावाला राज्यपालांची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 11:09 PM2020-07-29T23:09:53+5:302020-07-29T23:12:49+5:30

जयपूर : राजस्थानात राज्यपाल आणि गेहलोत यांच्यातील संघर्ष थांबला आहे. अखेर राज्यपाल मिश्र यांनी 14 ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन बोलावण्याची ...

rajasthan governor kalraj mishra agreed government demand convening assembly session from august 14 | सत्ता संघर्ष : राजस्थानात 14 ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन, सरकारच्या प्रस्तावाला राज्यपालांची मंजुरी

सत्ता संघर्ष : राजस्थानात 14 ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन, सरकारच्या प्रस्तावाला राज्यपालांची मंजुरी

Next

जयपूर :राजस्थानात राज्यपाल आणि गेहलोत यांच्यातील संघर्ष थांबला आहे. अखेर राज्यपाल मिश्र यांनी 14 ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन बोलावण्याची मंजुरी दिली आहे. यापूर्वी अशोक गेहलोत कॅबिनेटने विधानसभा अधिवेशन बोलावण्यासाठी सुधारित प्रस्तावाला मंजुरी दिली होती. यात 14 ऑगस्टला सत्र बोलावण्याची मागणी करण्यात आली होती. यामुळे अधिवेशन बोलावण्यासाठी आवश्यक असलेल्या 21 दिवसांच्या नोटिशीची आवश्यकताही पूर्ण झाली आहे. यावर राज्यपाल कलराज मिश्र सातत्याने जोर देत होते.

तत्पूर्वी, एका वरिष्ठ मंत्र्याने लवकरच संघर्ष संपेल असे म्हटले होते. कॅबिनेट बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी सांगितले होत, की ‘‘प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला जात आहे. मला पूर्ण आशा आहे, की आता संघर्ष संपेल आणि विधानसभा अधिवेशन लवकरच बोलावले जाईल.’’

खाचरियावास म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रस्ताव तयार करून पाठवला आहे. तो प्रस्ताव राजस्थानच्या हिताचा आहे.’’

राज्यपालांनी तीन वेळ परत पाठवला होता प्रस्ताव -
यापूर्वी राजभवनाने सरकारकडून पाठवण्यात आलेला सुधारित प्रस्ताव बुधवारी तिसऱ्यांदा सरकारकडे परत पाठवला होता. यात, अल्पावधीच्या नोटिशीवरच अधिवेश का बोलावू इच्छिता, हे स्पष्ट करा, असे राज्यपालांनी सरकारला सांगितले होते. तसेच, जर सरकारला विश्वासमत मिळवायचे असेल, तर ते लवकर, म्हणजेच अल्पावधीच्या नोटिशीवर अधिवेशन बोलावण्याचे कारण होऊ शकते, असेही राज्यपालांनी सरकारला सांगितले होते.

गेहलोत यांचे 15 आमदार संपर्कात असल्याच्या दाव्याने उडाली होती खळबळ -
राजस्थानमध्ये सुरू असलेला सत्ता संघर्ष सुरूच आहे. सचिन पायलट यांचा गटाने गेहलोत गटाचे 15 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. यामुळे राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडाली होती. सचिन पायलट गटात असलेले काँग्रेसचे वरिष्ठ आमदार हेमाराम चौधनी यांनी हा दावा केला होता. 

गेहलोत गटाचे 10 ते 15 आमदार संपर्कात असल्याचा दावा पायलट गटाकडून करण्यात आला होता. त्यापूर्वी काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेत वरिष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी पायलट यांच्यासोबत असलेले 3 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. हे आमदार लवकरच आमच्यासोबत येतील, असेही सुरजेवाला म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या -

लॉकडाउनमध्ये 'हा' साबण ठरला नंबर-1; लाईफबॉय अन् लक्सलाही टाकलं मागे

Unlock 3 Guidelines : जिमचं दार उघडणार, नाईट कर्फ्यूही मागे; पण शाळा-कॉलेज, थिएटर्स बंदच

15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन

आता डोळे वर करून बघणार नाही शत्रू, 'या' ठिकानाहून फक्त 20 मिनिटांत इस्लामबादवर हल्ले करून शकतं राफेल

सुस्साट वेग, खतरनाक रेंज अन् 70 लाखांचं क्षेपणास्त्र, जाणून घ्या राफेल का आहे 'ब्रह्मास्त्र'

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

Coronavirus Vaccine : जगभरात 150 व्हॅक्सीनवर काम सुरू; पण रेसमध्ये टॉपवर फक्त 'या' 4 लसी

CoronaVirus : भारतात 'या' 5 ठिकाणी होणार कोरोना लसीची चाचणी, असे निवडले जातायत लोक

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

Web Title: rajasthan governor kalraj mishra agreed government demand convening assembly session from august 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.