राजस्थानमध्ये रक्तरंजित थरार! न्यायायलात घेऊन जाताना गँगस्टरची हत्या, हल्लेखोर पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 16:47 IST2023-07-12T16:47:19+5:302023-07-12T16:47:43+5:30
भाजप नेते किरपाल सिंह जगिना हत्येप्रकरणी गँगस्टर कुलदीप सिंह जगिना याला अटक करण्यात आली होती.

राजस्थानमध्ये रक्तरंजित थरार! न्यायायलात घेऊन जाताना गँगस्टरची हत्या, हल्लेखोर पसार
राजस्थानच्या भरतपूरमध्ये आज काही अज्ञातांनी गँगस्टर कुलदीप जगिनाची गोळ्या झाडून हत्या केली. जिल्हा पोलीस त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गुंड कुलदीपचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, अज्ञातांनी आधी पोलिसांचा गुंगारा दिला आणि नंतर गोळ्या झाडल्या आणि पळून गेल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली.
टोलनाक्याजवळ झाला खून
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर पोलिसांचे एक पथक गँगस्टर कुलदीप सिंह जगिना याला पोलिस बसने भरतपूरला घेऊन जात होते. या गुंडाला सरकारी बसमधून भरतपूरला नेले जात होते. त्यानंतर भरतपूरच्या अमोली टोल प्लाझाजवळील जगिना येथे अचानक हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्लेखोरांनी सुमारे 8-10 राऊंड गोळीबार केला. या दरम्यान गोळी लागल्याने जगिनाचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस पथकाने गुंड जगिना याचा मृतदेह रुग्णालयात नेला. त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी रवाना करण्यात आला. तुम्हांला सांगतो की, भाजप नेते किरपाल सिंह जगिना हत्येप्रकरणी गँगस्टर कुलदीप सिंह जगिना याला अटक करण्यात आली होती.