शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

10 लाख रोजगार, महिलांना वर्षाला 10 हजार; राजस्थानमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मोठी आश्वासनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 12:40 IST

काँग्रेसने मंगळवारी राजस्थानसाठी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित होते.

काँग्रेसने मंगळवारी राजस्थानसाठी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित होते. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात 10 लाख रोजगार आणि 4 लाख सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन दिले आहे. याशिवाय कॉर्पोरेट बँकांकडून शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याचे आश्वासन दिले आहे. 

काँग्रेसनेही आपल्या जाहीरनाम्यात MSP वर कायदा आणणार असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडसारखच राजस्थानमध्ये जातनिहाय जनगणनेचं आश्वासन काँग्रेसने दिलं आहे. याशिवाय गावात व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

- काँग्रेसचे सरकार आल्यास दोन रुपये किलोने शेण खरेदी केले जाईल.- चिरंजीवी हेल्थ इन्शुरन्सची रक्कम 25 लाखांवरून 50 लाख रुपये करण्यात येणार आहे.- घरातील महिला प्रमुखाला वार्षिक 10,000 रुपये दिले जातील.- विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप आणि टॅबलेट उपलब्ध होतील.- 1.04 कोटी कुटुंबांना 500 रुपयांत सिलिंडर मिळणार आहे.- प्रत्येक मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची हमी.- जुनी पेन्शन.- MSP वर कायदा केला जाईल.- कृषी अर्थसंकल्पांतर्गत आमच्या सरकारने सुरू केलेल्या 12 मोहिमांचा विस्तार "दुप्पट" करू.- पंचायत स्तरावर भरतीसाठी एक नवीन योजना आणेल ज्यामध्ये हे कर्मचारी हळूहळू सरकारी रिक्त पदांमध्ये विलीन होतील आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतील.- महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक गावात आणि प्रत्येक प्रभागात महिला सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहेत.- लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये जलद न्याय मिळण्यासाठी आवश्यक पावलं उचलू.- रोडवेज बसमध्ये महिलांना महिनाभर मोफत प्रवासासाठी कूपन मिळणार.- शहरी विकास आणि समृद्धीला चालना देण्यासाठी जवळच्या दोन शहरांसाठी विशेष विकास प्राधिकरण स्थापन केले जाईल.- ज्या गावांमध्ये 100 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल त्या गावांना रस्त्याने जोडले जाईल.- सुशासनासाठी Accountability and Auto Service Delivery Act आणणार. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेस