शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

संतापजनक! RAS प्री पास झाल्यानंतर झालं लग्न; आता अधिकारी होता आलं नाही, म्हणून सुनेला घराबाहेर काढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 13:15 IST

उषा जेव्हा आरएएस प्री पास झाली होती, तेव्हा सासरच्या लोकांनी हे नाते जमवले होते. सून एसडीएम बनेल, असा त्यांचा विचार होता. मात्र, प्रचंड प्रयत्न करूनही ती अधिकारी होऊ शकली नाही. म्हणून तिचा छळ सुरू झाला. एवढेच नाही, तर तिला मारहाण करून घरातूनही बाहेर काढण्यात आले. (daughter in law)

झुंझुनूं - संपूर्ण जगात महिला शिक्षण आणि महिला सक्षमिकरणावर बोलले जाते. असे असतानाच महिला शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या राजस्थानातील झुंझुनूं जिल्ह्यातून एक अशी बातमी समोर आली आहे. जी वाचून, अशा विचारावर आपणही हैराण व्हाल. येथे एका सुनेला आरएएस होता आले नाही, म्हणून सासरच्या लोकांनी तिला घरातून बाहेर काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Rajasthan daughter in law could not become RAS she was expelled from the house)

ही सून जेव्हा आरएएस प्री पास झाली होती. तेव्हा सासरच्या लोकांनी हे नाते जमवले होते. सून एसडीएम बनेल, असा त्यांचा विचार होता. मात्र, प्रचंड प्रयत्न करूनही ती अधिकारी होऊ शकली नाही. म्हणून तिचा छळ सुरू झाला. एवढेच नाही, तर तिला मारहाण करून घरातूनही बाहेर काढण्यात आले. ऊषा असे या सुनेचे नाव आहे.

2013 मध्ये प्री पास -झुंझुनूं जिल्ह्यातील सूरजगड भागातील प्रभाग क्रमांक दोनमधील ऊषा यांनी सांगितले, की त्यांनी 2013 मध्येच आरएएस प्री पास केले होते. याच दरम्यान त्यांची आणि बुगाला येथील रहिवासी विकास कुमार यांची सोयरीक जमली. विकास कुमार हा पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये व्याख्याता आहे. त्यांना वाटत होते, की ऊषा लवकरच आरएएस होईल. यानंतर 2016 मध्ये या दोघांचे लग्न झाले. ऊषाने सांगितले, की लग्नानंतर आरएएस मेन्स झाली. या परीक्षेत तिला यश मिळू शकले नाही. यानंतर तिला टोमणे मारमे सुरू झाले. सासरच्या लोकांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. ऊषाचा पती स्वतः एक लेक्चरर आहे. मात्र, तोही बोलू लागला.

उषाचे वडील जगदीश प्रसाद लोहरानिया यांनी सांगितले, की नवलगड तालुक्यातील बुगाला गावातील सासरच्या लोकांनी उषाला हुंड्यासाठी छळ, घरगुती हिंसाचार आणि मारहाण करून घरातून बाहेर काढल्याची तक्रार करण्यात आली आहे. उषाचा पती विकास कुमार बुगालिया, सासू विमला देवी, सासरे नानडराम बुगालिया आणि त्यांच्या लग्नातील मध्यस्थ संजय कुमार आणि त्याची पत्नी प्रकाश वर्मा यांनी त्यांना मारहाण करून घरातून बाहेर काढले आहे. उषाने रिपोर्टमध्ये लिहिले आहे, की तिचा पती विकास कुमारला दारूचे व्यवसनही आहे.

छळामुळे मुख्य परीक्षेत यश मिळाले नाही -ऊषाने सागितले, की 2016 मध्ये राजस्थान लोक सेवा आयोगाची आरएएस प्री परीक्षा पास झाले होते. आरएएस मेन्सची तयारी करत होते. लग्नानंतर उषा पतीसोबत सासरी राहत होती. पती आणि सासरच्या लोकांच्या छळामुळे तिला आरएएस परीक्षा पास होता आले नाही. यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी आरएएस होऊ शकली नाही. म्हणून तिला घरातून बाहेर काढले. ऊषाने सांगितले, की ती इतर परीक्षांचीही तयारी करत होती, पण यश मिळाले नाही. यामुळेच सासरच्या लोकांनी छळ करायला सुरुवात केली.

टॅग्स :Rajasthanराजस्थानmarriageलग्नPoliceपोलिस