शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Video : राजस्थान सत्ता संघर्ष; गेहलोतांनी घेतली राज्यपालांची भेट, राजभवनातच काँग्रेस आमदारांचा ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 16:08 IST

राजभवनात जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी फेअरमाउंट हॉटेलमध्ये आमदारांसोबत बैठक घेतली. याबैठकीत, आमदारांनी एकत्रित राहावे. आपल्याकडे पूर्ण बहुमत आहे, एवढेच नाही, तर आपले सरकार पूर्ण पाच वर्ष चालणार आहे, अशी खात्रीही गेहलोतांनी आमदारांना दिली.

ठळक मुद्देराजस्थानात व्हिप उल्लंघन प्रकरणावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली.मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी राजभवनात जाऊन राज्यपाल कलराज मिश्र यांची भेट घेतली.यावेळी गेहलोत गटाच्या काँग्रेस आमदारांनी राजभवन परिसरात ठिय्या द्यायला सुरुवात केली.

जयपूर -राजस्थानात व्हिप उल्लंघन प्रकरणावर आज उच्च न्यायालयाने (High Court)  दिलेल्या आदेशानंतर, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी राजभवनात जाऊन राज्यपाल कलराज मिश्र यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी विधानसभा अधिवेशन बोलावण्यासंदर्भात राज्यपालांशी चर्चा केली. यावेळी गेहलोत गटाच्या काँग्रेस आमदारांनी राजभवन परिसरात ठिय्या द्यायला सुरुवात केली. तसेच गेहलोत जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. हे सर्व आमदार बसमध्ये बसून राजभवनात पोहोचले आहेत. 

राजभवनात जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी फेअरमाउंट हॉटेलमध्ये आमदारांसोबत बैठक घेतली. याबैठकीत, आमदारांनी एकत्रित राहावे. आपल्याकडे पूर्ण बहुमत आहे, एवढेच नाही, तर आपले सरकार पूर्ण पाच वर्ष चालणार आहे, अशी खात्रीही गेहलोतांनी आमदारांना दिली.

काय म्हणाले उच्च न्यायालय -राजस्थान उच्च न्यायालयात (Rajasthan High Court) आज राजस्थान विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या नोटीशीवर सुनावणी झाली. यावेळी, विधानसभा अध्यक्षांविरोधात सचिन पायलट गटाने दाखल केलेली याचिका योग्य असल्याचे म्हणत राजस्थान उच्च न्यायालयाने सचिन पायलट गटाला मोठा दिलासा दिला. म्हत्वाचे म्हणेज, न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थकांना बजावलेल्या नोटीशीलाही स्थगिती दिली आहे. यामुळे आता विधानसभा अध्यक्षांना पायलट आणि त्यांच्या समर्थकांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही. परिणामी परिस्थिती जैसेथेच राहणार आहे. या प्रकरणाची सुनावणी पुढेही सुरूच राहील.

केंद्र सरकारकडून राज्यपालांवर दबाव टाकला जातोय - शुक्रवारी पत्राकर परिषदेत बोलताना अशोग गेहलोत म्हणाले, होते, की राज्यपालांवर केंद्र सरकारकडून दबाव टाकला जात आहे. मात्र, त्यांनी संविधानाची शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांनी कुणाच्याही दबावात यायला नको. एवढेच नाही, तर राज्यातील जनतेने संतप्त होऊन राजभवनाला घेराव घातला, तर आपली जबाबदारी नसेल, असेही गेहलोतांनी म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या -

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल

CAAचा फायदा घेण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम करताहेत धर्मांतर, 'या' धर्माचा करत आहेत स्वीकार, सरकार अलर्ट!

CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus : वैज्ञानिकांचा दावा!; कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या 'या' औषधाने, फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलटMLAआमदार