शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Gehlot Vs Pilot: काँग्रेस हायकमानचा गेहलोतांना झटका, सचिन पायलटांचं राजकीय वजन वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 19:55 IST

राजस्थानातील जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी जवळपास गेल्या 11 महिन्यांपासून ठप्प आहे. येथे नियुक्त्यांसाठी तयारी सुरू झाली, की काही ना काही अडचणीही येतात. मात्र, आता काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा संघटनात्मक नियुक्त्यांच्या कामाला वेग आला आहे.

जयपूर - राजस्थानकाँग्रेसमध्येसचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात वाद सुरू आहे. यातच आता काँग्रेस हाईकमानने मुख्यमंत्री गेहलोत यांना झटका दिला आहे. काँग्रेस नेतृत्वाने जिलाध्यक्षांच्या नियुक्तीसाठी थेट जिल्हा प्रभारींकडूनच नावे मागविली आहेत. अर्थात काँग्रेसच्या जिलाध्यक्षांच्या नियुक्तीचा निर्णय आता राजस्थान काँग्रेस नव्हे  तर पक्ष श्रेष्ठी करतील. यामुळे, आता पायलट यांचे राजकीय वजन वाढेल, असे बोलले जात आहे. (Rajasthan Big jolt to ashok gehlot congress high command ask panel name directly)

राजस्थानातील जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी जवळपास गेल्या 11 महिन्यांपासून ठप्प आहे. येथे नियुक्त्यांसाठी तयारी सुरू झाली, की काही ना काही अडचणीही येतात. मात्र, आता काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा संघटनात्मक नियुक्त्यांच्या कामाला वेग आला आहे. काँग्रेसमध्ये लवकरच जिल्हाध्यक्षांसह इतर पदांसाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीला बाजूला सारून थेट एआयसीसीने थेट पॅनल मागविण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सचिन पायलट 6 दिवस दिल्लीत थांबले, ना राहुल भेटले ना प्रियंकां गांधींची भेट झाली

सर्वसाधारणपणे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमानेच पॅनल दिल्लीला पाठवीले जातात. यावर पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतात. मात्र, यावेळी पीसीसीऐवजी थेट एआयसीसीनेच जिल्हाध्यक्षांची नावे मागवली आहेत. जिल्हा प्रभारींना 30 जूनपर्यंत तीन-तीन नावांचे पॅनल पाठविण्यास सांगण्यात आले आहे. अर्थातच आजच पॅनलची नावे पाठविण्याची अखेरची तारीखही आहे.

थेट नावे मागविण्याला काहीच हरकत नाही - डोटासराथेट नावे मागविल्यासंदर्भातील प्रश्नाव राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह डेटासरा म्हणाले, पीसीसीला नावे मागून-मागून चार महिने झाले आहेत. थेट नावे मागविण्याला काहीच हरकत नाही आणि मलाही नावे द्यायला सांगण्यात आले आहे. डोटासरा म्हणाले, सर्व नेत्यांशी चर्चा करून जिल्हा अध्यक्षांच्या नावांवर निर्णय घेण्यात येईल आणि पीसीसीने पाठविलेल्या नावांवरच पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. 

टॅग्स :congressकाँग्रेसSachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थान