Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 15:49 IST2025-09-06T15:49:20+5:302025-09-06T15:49:53+5:30

इंदूरमधील व्यापारी राजा रघुवंशी यांच्या हत्येचा तपास केल्यानंतर मेघालय पोलिसांच्या एसआयटीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

Raja Raghuvanshi: Conspiracy, murder and evidence... Meghalaya Police recorded the crime of Sonam Raghuvanshi and Raj in as many as 790 pages! | Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

इंदूरमधील व्यापारी राजा रघुवंशी यांच्या हत्येचा तपास केल्यानंतर मेघालय पोलिसांच्या एसआयटीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी सोहरा उपविभागाच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात ७९० पानांचे आरोपपत्र सादर केले. या प्रकरणात राजा रघुवंशी यांची पत्नी सोनम रघुवंशी, तिचा कथित प्रियकर राज कुशवाह आणि त्यांचे सहकारी आकाश राजपूत, आनंद कुर्मी आणि विशाल सिंह चौहान यांना आधीच अटक करण्यात आली आहे.

सध्या हे सगळे न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोनम आणि राज यांनी राजाला मारण्याचा कट रचला होता, ज्यात इतर तीन आरोपींनी मदत केली होती. या सर्वांवर खून (कलम १०३(१) बीएनएस), पुरावे नष्ट करणे (कलम २३८(अ) बीएनएस) आणि गुन्हेगारी कट (कलम ६१(२) बीएनएस) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. पूर्व खासी हिल्सचे एसपी विवेक सायम म्हणाले की, अतिरिक्त फॉरेन्सिक अहवाल प्राप्त होताच या प्रकरणातील आणखी तीन सह-आरोपींविरुद्ध पूरक आरोपपत्र दाखल केले जाईल.

राजा रघुवंशी प्रकरणाने देशभरात खळबळ
प्रॉपर्टी डीलर सिलोम जेम्स, लोकेंद्र तोमर (सोनम हत्येनंतर जिथे लपली होती त्या इमारतीचे मालक) आणि बलबीर अहिरवार (सुरक्षा रक्षक) हे तिघेही सह-आरोपी आहेत. या तिघांनाही पुरावे नष्ट करणे आणि लपवणे या आरोपाखाली यापूर्वी अटक करण्यात आली होती, परंतु सध्या ते जामिनावर आहेत. लग्नानंतर राजा रघुवंशी यांची हनिमून ट्रिप दरम्यान हत्या झाल्याने या हाय-प्रोफाइल खून प्रकरणाने देशभरात लोकांना धक्का बसला होता. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर, आता न्यायालयात सुनावणीची प्रक्रिया वेगवान होण्याची अपेक्षा आहे.

विद्रूप अवस्थेत आढळलेला राजाचा मृतदेह!
इंदूरचे व्यापारी राजा रघुवंशी यांचे या वर्षी ११ मे रोजी सोनमशी लग्न झाले होते. २० मे रोजी दोघेही हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. त्यानंतर तीन दिवसांनी दोघेही बेपत्ता झाल्याची बातमी आली. त्यानंतर २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. सोहरा येथील वेसाडोंग धबधब्याजवळील दरीत मृतदेह आढळला. सोनम रघुवंशीने तिचा कथित प्रियकर राज कुशवाहासोबत मिळून आकाश राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद कुर्मी या तीन जणांच्या मदतीने राजाला ठार मारले. मेघालय एसआयटीच्या तपासात हा दावा करण्यात आला आहे.

Web Title: Raja Raghuvanshi: Conspiracy, murder and evidence... Meghalaya Police recorded the crime of Sonam Raghuvanshi and Raj in as many as 790 pages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.