शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

फिटनेस फ्रीक असूनही कार्डियक अरेस्ट... बॅडमिंटन खेळताना जमिनीवर कोसळले अन् श्वास थांबला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:47 IST

अमृत बजाज यांचा बॅडमिंटन खेळताना अचानक कार्डियक अरेस्टने मृत्यू झाला.

छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील एका दुर्दैवी घटनेने शहरवासीयांना सुन्न केलं आहे. ४८ वर्षीय हार्डवेअर व्यावसायिक अमृत बजाज यांचा बॅडमिंटन खेळताना अचानक कार्डियक अरेस्टने मृत्यू झाला. ही घटना शहरातील अश्वनीनगर सोनकर बाडी बॅडमिंटन कोर्टवर सोमवारी सकाळी घडली. ओपन बॅडमिंटन कोर्टवर अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याचं सांगितलं जात आहे. अमृत नेहमीप्रमाणे सकाळी कोर्टवर खेळायला आले होते, मात्र शटल उचलताच त्यांचा जीव गेला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

अमृत बजाज हे रायपूरमधील एक प्रतिष्ठित हार्डवेअर व्यापारी होते आणि आरोग्याबाबत अत्यंत जागरूक मानले जात होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता, परंतु नियमित व्यायामाने त्यांनी तो नियंत्रणात ठेवला होता. त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांच्या मते, अमृत बॅडमिंटनशिवाय क्रिकेटही खेळायचे आणि सकाळच्या दिनचर्येत खेळाला प्राधान्य द्यायचे. घटनेच्या दिवशी ते 'डबल्स' मॅच खेळत होते. सामन्यादरम्यान एक शॉट मारल्यानंतर लगेचच त्यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले.

सोबत खेळणाऱ्या खेळाडूंना सुरुवातीला वाटलं की, ते घसरून पडले आहेत, परंतु जेव्हा अमृत यांनी कोणतीही हालचाल केली नाही, तेव्हा ते तातडीने त्यांच्याकडे धावले आणि तिथेच त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण 'कार्डियक अरेस्ट' असल्याचं सांगण्यात आलं आहे. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये अमृत हे खेळताना आणि अचानक कोसळताना दिसत आहेत. 

अमृत बजाज यांच्या पश्चात पत्नी आणि मुलं असा परिवार असून ते या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. अमृत हे एक उत्साही व्यक्ती होते आणि खेळ त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता, असं त्यांच्या मित्रांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद बाब आढळलेली नाही. शहरातील बॅडमिंटन प्रेमींमध्ये या घटनेमुळे शोककळा पसरली असून अनेक कोर्ट्सवर आता आरोग्य तपासणीचा सल्ला दिला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fitness enthusiast dies of cardiac arrest while playing badminton.

Web Summary : Raipur businessman, अमृत बजाज, 48, died of cardiac arrest while playing badminton. A fitness enthusiast, he collapsed mid-game. Postmortem confirmed cardiac arrest. The incident, captured on CCTV, shocked the community; investigations are ongoing.
टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडBadmintonBadmintonDeathमृत्यूHeart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोग