Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 22:50 IST2025-10-18T22:49:44+5:302025-10-18T22:50:31+5:30
Fake News: 'फेक न्यूज' आणि दिशाभूल करणाऱ्या लोकांविरोधात रेल्वे प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली.

Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांमध्ये अनावश्यक गोंधळ आणि भीती निर्माण करणाऱ्या 'फेक न्यूज' आणि दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओंविरोधात रेल्वे प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली आहे. रेल्वेशी संबंधित जुने किंवा वस्तुस्थिती नसलेले व्हिडिओ पसरवणाऱ्या २० हून अधिक सोशल मीडिया हँडलची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या गर्दीचा गैरफायदा घेत काही समाजविरोधी सोशल मीडिया हँडल जाणूनबुजून जुने आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित करत आहेत. या व्हिडिओंमध्ये रेल्वे स्थानकांवरील अवाजवी गर्दी दाखवली जाते. यामुळे प्रवाशांमध्ये अनावश्यक गोंधळ आणि भीती निर्माण होते. अशा फेक न्यूज आणि दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओंना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. या समाजविरोधी घटकांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासन सध्या २४ तास सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे.
रेलवे से जुड़ी गलत या पुरानी जानकारी साझा करना न केवल भ्रम फैला सकता है, बल्कि इससे यात्रियों को परेशानी भी हो सकती है और कानूनी कार्रवाई का भी खतरा हो सकता है।
— Northern Railway (@RailwayNorthern) October 17, 2025
इसलिए, हमें जिम्मेदार नागरिक बनकर सही जानकारी साझा करनी चाहिए और दूसरों को भी जागरूक करना चाहिए। इससे हम रेल और… pic.twitter.com/YRnnqyaXlS
प्रवाशांना रेल्वेचे आवाहन
या पार्श्वभूमीवर रेल्वेने सर्व सोशल मीडिया वापरकर्त्यांना एक महत्त्वाचे आवाहन केले. कोणताही व्हिडिओ किंवा माहिती शेअर करण्यापूर्वी त्याची वस्तुस्थिती पूर्णपणे तपासावी. पडताळणी केल्याशिवाय रेल्वे स्थानकांवर गर्दी दाखवणारे किंवा इतर दिशाभूल करणारे व्हिडिओ शेअर करणे टाळावे. रेल्वेच्या या कडक भूमिकेमुळे सणासुदीच्या काळात सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना मोठा दणका बसण्याची शक्यता आहे.