रेल्वेचा तिकिटाचा काळाबाजार : दोघांना अटक

By Admin | Updated: May 9, 2014 22:48 IST2014-05-09T22:48:12+5:302014-05-09T22:48:12+5:30

कोल्हापूर : रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या दोघांना रेल्वेच्या पुणे येथील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी (दि.९) कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे सायंकाळी पकडले. गणेश आप्पासाो पोवार (वय २० रा. रुकडी ता. हातकणंगले) व राजेंद्र रावसाो दरिबे (वय २९ रा. इचलकरंजी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दोघांकडून एकूण सहा रेल्वेची तिकिटे जप्त केली.

Railway ticket black market: Both arrested | रेल्वेचा तिकिटाचा काळाबाजार : दोघांना अटक

रेल्वेचा तिकिटाचा काळाबाजार : दोघांना अटक

ल्हापूर : रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या दोघांना रेल्वेच्या पुणे येथील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी (दि.९) कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे सायंकाळी पकडले. गणेश आप्पासाो पोवार (वय २० रा. रुकडी ता. हातकणंगले) व राजेंद्र रावसाो दरिबे (वय २९ रा. इचलकरंजी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दोघांकडून एकूण सहा रेल्वेची तिकिटे जप्त केली.
दरम्यान, काल (गुरुवारी) मिरज येथे रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने इचलकरंजीमधील आशिष विजय रावळ (वय २३) या एजंटाला अटक केली होती. ही घटना ताजी असताना कोल्हापुरात दोघांना तिकिटाचा काळा बाजार करणार्‍या दोघांना अटक केले. अटक केलेल्या तिघांपैकी दोघेजण इचलकरंजीतील आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे रेल्वेच्या तिकिटाचा काळाबाजार करणारे संशयित गणेश पोवार व राजेंद्र दरिबे या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. पोवारकडून चार तर दरिबेकडून दोन रेल्वेची तिकिटे पोलिसांनी हस्तगत केली. या दोघांना मिरज रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकास ताब्यात दिले.
-------------------------

Web Title: Railway ticket black market: Both arrested