शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेडब्यांची निविदा रद्द, चीनला दणका; मेक इन इंडियालाच देणार प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 03:13 IST

रेल्वे खात्याचा कठोर निर्णय, हे ४४ रेल्वेडबे बनविण्याचे कंत्राट चीनशी संबंधित कंपनीला मिळण्याची शक्यता आहे हे लक्षात आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली व ही निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आली.

नवी दिल्ली : वंदे भारत योजनेच्या अंतर्गत सेमी-हायस्पीड ट्रेनचे ४४ डबे बनविण्यासाठी जागतिक स्तरावर मागविलेल्या निविदांची प्रक्रिया रेल्वेखात्याने रद्द केली आहे. चिनी कंपनीचा संयुक्त प्रकल्प असलेल्या सीआरसीसी पायोनियर इलेक्ट्रिक या कंपनीने या कामासाठी निविदा भरली होती व तिला हे काम मिळण्याची शक्यता होती. हे लक्षात येताच सारी निविदा प्रक्रियाच रद्द करून भारताने पुन्हा एकदा चीनला दणका दिला आहे.

पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चीनच्या लष्कराबरोबर १५ जून रोजी झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर चीनविरोधात भारतामध्ये संतापाची लाट उसळली. चीनला धडा शिकविण्यासाठी भारताने त्या देशातील कंपन्यांना दिलेली काही कंत्राटे रद्द केली. ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. त्यानंतरचे पुढचे पाऊल म्हणून आता वंदे भारत रेल्वेच्या डबेनिर्मितीची निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आली. देशात आता मेक इन इंडियाच्या तत्त्वाला प्राधान्य दिले जाणार आहे. रेल्वेखात्याने म्हटले आहे की, वंदे भारत योजनेच्या अंतर्गत सेमी-हायस्पीड रेल्वेगाड्यांच्या ४४ डब्यांच्या निर्मितीसाठी नव्याने निविदा मागविण्याची प्रक्रिया आठवडाभराच्या आत सुरू केली जाईल. हे रेल्वेडबे बनविण्यासाठी जागतिक स्तरावर मागविलेल्या निविदांमध्ये विदेशातून सीआरसीसी पायोनियर इलेक्ट्रिक या एकमेव कंपनीची निविदा प्राप्त झाली होती. चीनमधील सीआरसीसी योंगजी इलेक्ट्रिकल कंपनी व गुरुग्राममधील पायोनियर फिल-मेड कंपनी या दोघांनी मिळून ही संयुक्त कंपनी सुरू केली आहे.हे ४४ रेल्वेडबे बनविण्याचे कंत्राट चीनशी संबंधित कंपनीला मिळण्याची शक्यता आहे हे लक्षात आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली व ही निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आली. वंदे भारत सेमी-हायस्पीड ट्रेनचे डबे बनविण्यासाठी चेन्नईतील इंडियन रेल्वे इंटेग्रल कोच फॅक्टरीनेही १० जुलै रोजी निविदा भरली होती.थर्मल कॅमेराची निविदाही केली रद्दकोरोना स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी थर्मल कॅमेरा खरेदी करण्याकरिता निविदा मागविण्याची सुरू केलेली प्रक्रियाही रेल्वेखात्याने १ जुलै रोजी रद्द केली होती. या निविदा प्रक्रियेचे निकष चिनी कंपनीसाठी फायदेशीर आहेत, असा आरोप काही भारतीय कंपन्यांनी केल्यावर हा निर्णय घेण्यात आला होता.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत