रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 20:20 IST2025-12-04T20:19:32+5:302025-12-04T20:20:25+5:30
Railway 1.20 Vacancy Details: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत 2024-25 मधील रेल्वे भरतीचा डेटा शेअर केला.

रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
Railway 1.20 Vacancy Details: भारतीय रेल्वेतील रिक्त पदे भरण्याचे काम वेगाने सुरू आहे. रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, सध्या 1,20,579 पदांची भरती प्रक्रिया विविध टप्प्यांत सुरू आहे. 2024 मध्ये एकूण 10 मोठे CEN नोटिफिकेशन जारी झाले, ज्यांत 92,116 पदांचा समावेश होता. तर 2025 च्या भरती कॅलेंडरअंतर्गत 28,463 नव्या पदांची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रेल्वेत सतत भरती आवश्यक
हिवाळी अधिवेशनादरम्यान, लोकसभेत बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वेत तांत्रिक सुधारणा, ऑपरेशनल विस्तार आणि वाढत्या मनुष्यबळाच्या गरजेमुळे भरती प्रक्रिया सतत सुरू ठेवावी लागत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया "रोलिंग बेसिस" वर करण्यात येते. 2024 च्या भरतीमध्ये सेफ्टी, तांत्रिक आणि नॉन-टेक्निकल अशा सर्व प्रमुख विभागांचा समावेश होता.
Recruitment process on for 1,20,579 vacancies notified in 2024 and 2025; Railways provided 5.08 lakh jobs in last 11 Years: Union Minister @AshwiniVaishnaw
— PIB India (@PIB_India) December 3, 2025
With no paper leaks, no malpractice and certainty of exams, Railways completes First/Single Stage Computer Based Tests for… pic.twitter.com/xp7M66vkLa
यातील प्रमुख पदे :
असिस्टंट लोको पायलट (ALP)
टेक्नीशियन
रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) – SI व कॉन्स्टेबल
ज्युनियर इंजिनिअर (JE), DMS, CMA
पॅरामेडिकल स्टाफ
NTPC (Graduate व Undergraduate)
मिनिस्टीरियल आणि आइसोलेटेड कॅटेगरी
लेव्हल-1 पदे - ट्रॅक मेंटेनर, पॉईंट्समन, असिस्टंट इ.
59,678 पदांची भरती पूर्ण
रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 59,678 पदे भरली गेली आहेत:
| पद | एकूण भरती |
|---|---|
| ALP | 18,799 |
| टेक्नीशियन | 14,298 |
| JE/DMS/CMA | 7,951 |
| RPF SI | 452 |
| RPF Constable | 4,208 |
| पॅरामेडिकल | 1,376 |
| NTPC Graduate | 8,113 |
| NTPC Undergraduate | 3,445 |
| मिनिस्ट्रियल/आइसोलेटेड | 1,036 |
सध्या सुरू परीक्षा: 36,000 हून अधिक पदांसाठी भरती
RRB Group D (Level-1): 32,438 पदे
CBT परीक्षा: 27 नोव्हेंबर 2025 - 16 जानेवारी 2026
140 शहरांत, 15 भाषांत परीक्षा
RPF Constable PET: 4,208 पदे
PET परीक्षा: 13 नोव्हेंबर – 6 डिसेंबर 2025
| CEN No. | पद | रिक्त पदे | अधिसूचना |
|---|---|---|---|
| 01/2025 | ALP | 9,970 | मार्च 2025 |
| 02/2025 | टेक्नीशियन | 6,238 | जून 2025 |
| 03/2025 | पॅरामेडिकल | 434 | जुलै 2025 |
| 04/2025 | सेक्शन कंट्रोलर | 368 | ऑगस्ट 2025 |
| 05/2025 | JE / DMS | 2,585 | ऑक्टोबर 2025 |
| 06/2025 | NTPC Graduate | 5,810 | ऑक्टोबर 2025 |
| 07/2025 | NTPC Under-Graduate | 3,058 | ऑक्टोबर 2025 |
कोणताही पेपर लीक नाही, रेल्वेमंत्र्यांचा दावा
रेल्वेच्या मोठ्या व पारदर्शक भरती प्रक्रियेबाबत मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले की, आतापर्यंत पेपर लीक किंवा गैरप्रकाराचे एकही प्रकरण समोर आले नाही. अनेक शहरांमध्ये केंद्रे, विविध भाषांतील प्रश्नसंच आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याने भरती प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीची आहे. याच कारणांमुळे काही वेळा प्रक्रियेत विलंब होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.