शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

रेल्वेच्या धडकेने सिंहीण बिथरली; इंजिनवर चढली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 5:18 AM

मालवाहू रेल्वेच्या किरकोळ धडकेमुळे एक सिंहीण एवढी बिथरली की, सुरक्षेसाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही लपून राहावे लागले.

राजकोट : मालवाहू रेल्वेच्या किरकोळ धडकेमुळे एक सिंहीण एवढी बिथरली की, सुरक्षेसाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही लपून राहावे लागले. गुजरातच्या आमरेली जिल्ह्यातील पिपावाव गावाजवळ ही घटनाघडली.वास्तविक या धडकेत सिंहीण जखमी झाली नव्हती. तथापि, ती प्रचंड संतापली आणि रेल्वेच्या इंजिनावरच चढून बसली. तिथे ती आक्रमकपणे झटापट करीत राहिली. या रेल्वेत वन विभागाचे दोन कर्मचारी होते. त्यांना सिंहांना हाताळण्याचा अनुभव होता.सिंहाच्या जवळ जाण्यातही ते तरबेज होते. तथापि, बिथरलेल्या सिंहिणीचा अवतार पाहून तेही घाबरले. तिच्या नजरेस पडू नये, म्हणून ते एका रेल्वे डब्याच्या आड लपून राहिले.पिपवावपासून दोन किलोमीटर अंतरावरील उचैया रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. हा भाग जंगलाने व्यापलेला आहे. वन विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच रेल्वे पुढे जाऊ शकते.एक मालवाहू रेल्वे असाच हिरवा कंदील मिळाल्यानंतर स्थानकातून बाहेर पडली. तथापि, रेल्वे सुरू झाल्यानंर अवघ्या मिनिटभरातच एक सिंहीण रेल्वे मार्गावर अवतरली. चालकाने ब्रेक लावले. तरीही सिंहिणीला इंजिनाचा धक्का लागलाच. त्यामुळे सिंहीणबिथरली. (वृत्तसंस्था)नंतर गेली निघूनवन संरक्षक ए. सी. पटेल यांनी सांगितले की, सिंहीण एवढी संतापली होती की, आमच्या कर्मचाºयांना एका डब्याच्या आड लपावे लागले. काही मिनिटांनंतर सिंहीण उडी मारून निघून गेली.या धडकेत सिंहीण जखमी झाली आहे का, याचा तपास वन कर्मचाºयांनी दिवसभर केला. तथापि, जवळपास कोणतेही जखमी जनावर आढळून आले नाही.सूत्रांनी सांगितले की, येथून ५0 कि. मी. अंतरावरील बोरला गावाजवळ एका मालवाहून रेल्वेने यापूर्वी तीन सिंहांना चिरडलेले होते.

टॅग्स :wildlifeवन्यजीव