सत्यपाल मलिक यांच्या निकटवर्तीयांवर छापे, विमा घोटाळा प्रकरणात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 09:31 IST2023-05-18T09:30:05+5:302023-05-18T09:31:10+5:30
राज्यपाल असताना विम्याशी संंबंधित दोन फायली मंजूर करण्यासाठी आपल्यावर दबाव आणला गेला अशी तक्रार मलिका यांनी केली होती.

सत्यपाल मलिक यांच्या निकटवर्तीयांवर छापे, विमा घोटाळा प्रकरणात कारवाई
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील विमा घोटाळ्याच्या संबंधात माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या निकटवर्तीयांच्या जम्मू आणि काश्मीर तसेच दिल्लीतील ९ ठिकाणांवर बुधवारी सीबीआयने छापे मारले. सीबीआयने बुधवारी सकाळी मलिक यांचे माजी प्रसिद्धीसचिव सुनक बाली तसेच त्यांचे माजी स्वीय सहायक कंवर राणा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापा टाकला.
राज्यपाल असताना विम्याशी संंबंधित दोन फायली मंजूर करण्यासाठी आपल्यावर दबाव आणला गेला अशी तक्रार मलिका यांनी केली होती.
चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे का लागले?
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० सैनिक शहीद झाल्याच्या घटनेत पंतप्रधानांवर तसेच भाजपवर टीका केल्याबद्दल मलिक यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे शुक्लकाष्ठ लावण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. पण मलिक यांनी भाजपवर आरोप केल्यामुळे सीबीआय चौकशी करण्यात येत असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यापूर्वीच फेटाळून लावला आहे.