राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 06:22 IST2025-08-17T06:21:26+5:302025-08-17T06:22:13+5:30
'चोरी चोरी चुपके चुपके' व्हिडीओ पोस्ट

राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
पाटणा : बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवार (दि. १७) पासून सासराम येथून 'व्होट अधिकार यात्रा' सुरू करणार आहेत. मतचोरीच्या प्रकारांविरोधात जनता जागी झाली आहे, असे वक्तव्य केलेला नवा व्हिडीओ त्यांनी समाजमाध्यमावर पोस्ट केला आहे.
राहुल गांधी यांनी एक्सवर प्रसारित केलेल्या 'लापता व्होट' या व्हिडीओत म्हटले आहे की, आता कोणीही चोरी चोरी - चुपके चुपके काहीही गैरप्रकार करू शकणार नाही. जनता जागी झाली आहे. नागरिकांच्या मतांची चोरी म्हणजे त्यांच्या हक्कांचीच चोरी आहे. या विरोधात आवाज उठवू या.
निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद : राहुल यांनी
केलेले आरोप व मतदार यादी पुनरावलोकनाला विरोध या पार्श्वभूमीवर आयोग रविवारी पत्रकार परिषद घेणार आहे.